नितीश कुमारांच्या जिज्ञासेने बिल गेटस देखील झाले ‘हैराण’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जगातील सर्वात श्रीमंतांमध्ये आघाडीवर असलेले व सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे बिल गेट्स यांच्या फाऊंडेशनमार्फत भारतातील विविध राज्यात अनेक योजना सुरु आहेत. त्याची पाहणी करण्यासाठी ते नेहमीच विविध राज्यांना भेटी देत असतात. पण नुकतीच त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांची भेट घेतली आहे. या भेटीत नीतीश कुमार यांची योजना ऐकून बिल गेट्सही हैरान झाले. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात खुद बिल गेट्स यांनी ही गोष्ट सांगितली.

बिल गेट्स यांनी आपल्या भारत दौऱ्यात अनेक राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पाटणा येथे त्यांची मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्याशी भेट झाली. जवळपास १० वर्षानंतर त्यांनी भेटलेल्या नीतिश कुमार यांची जिज्ञासा पाहून बिल गेट्स ही हैराण झाले.

बिहार दौऱ्यानंतर ते नवी दिल्लीत आले. एका कार्यक्रमात त्यांनी नीतिश कुमार यांच्या भेटीतील चर्चेची माहिती सांगितली. बिल गेट्स म्हणाले नीतीश कुमार यांनी चांगले काम केले आहे. त्यात आमच्या संस्थेचा सहभाग आहे. मात्र, इतक्या वर्षानंतर झालेल्या बैठकीत आपल्याला अंदाजच नव्हता की ते जलवायु परिवर्तनसारखा मुद्दा घेतील. कारण असे मुद्दे तर सिएटल, वॉशिग्टंगन, लंडन अथवा पॅरिस अशा शहरात विचार केला जातो. पण पाटणात ते म्हणत होते की, हा मोठा मुद्दा आहे. आमची ही एक समस्या आहे. जेसे पाणी समस्या, बी बियाणे या समस्या कमी करण्यासाठी आम्हाला मदत करा.

बिल गेट्स यांच्या या प्रतिक्रियेमुळे नितीश कुमार यांच्या जल जीवन हरियाली या कार्यक्रमाला शाबासकी मिळाली आहे. नीतीश कुमार यांनी या कार्यक्रमासाठी २४ हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. त्यात पाणीची परंपरागत स्त्रोत विहीरी, आड, तलाव हे पुर्नजीवत करणे, वृक्षारोपण करणे असे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. येत्या काही दिवसात नीतीश कुमार हे जल जीवन हरियाली हा मुद्दा घेऊन राज्यभर यात्रा काढणार आहेत.

Visit : Policenama.com