आश्चर्यजनक ! वैज्ञानिकांना सापडला आतापर्यंतचा दुर्मिळ पक्षी, जो नरही आहे अन् मादीही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पेन्सिल्वेनियात एक असा दुर्मिळ पक्षी सापडला आहे जो अर्धा नर आणि अर्धा मादी आहे. म्हणजेच हा पक्षी दुसऱ्या नरासोबत प्रजनन करून अंडीही देऊ शकतो आणि दुसऱ्या मादीसोबत प्रजनन करून तिला गर्भवतीही करू शकतो. गेल्या 64 वर्षात पहिल्यांदाच असं झालं आहे. सध्या या दुर्मिळ पक्षाची चांगलीच चर्चा पहायला मिळत आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, या अनोख्या पक्षाचं नाव ग्रुजबिक्स आहे. या पक्षाच्या शरीराची बनावट ही मादी आणि नर दोन्ही पक्षांसारखी आहे. पक्षाच्या या प्रजातीत बाहेरील पंख काळे आणि मोठे असतात. या प्रजातीतील पक्षांचे पंख रंगीत असतात या सापडलेल्या पक्षाच्या छातीवर कोणतंही निशाण नाही. हीच मादा होण्याची निशाणी आहे. वैज्ञानिक भाषेत या पक्षाला गाएंड्रोमॉरफिजम म्हटलं जातं.

कसे तयार होतात असे पक्षी ?

वैज्ञानिकांनुसार, असे पक्षी तेव्हा जन्माला येतात जेव्हा एका मादीच्या अंड्यात नराचे असे स्पर्म मिळतात ज्यात 2 न्युक्लिअस असतात. अशा पिल्लामध्ये नर आणि मोदी अशा दोन्हीचे क्रोमोजोम येतात. अशी घटना फारच कमी वेळा घडते. हा पक्षी मिळण्याआधी 64 वर्षांआधी असाच एक पक्षी सापडला होता. यावर्षी पावडरमिल एविएशन रिसर्च सेटरमध्ये टीम पक्षांची जनगणना करत होती. तेव्हा हा पक्षी सापडला.

हा पक्षी नराकडे आकर्षित होतो की मादीकडे ?

पक्षांची ही प्रजाती खूपच खास आहे. हा पक्षी दुसऱ्या नरासोबत प्रजनन करून अंडीही देऊ शकतो आणि दुसऱ्या मादीसोबत प्रजनन करून तिला गर्भवतीही करू शकतो. वैज्ञानिकांचं मत आहे की, पुढं हा पक्षी मादीच्या भूमिकेत राहणार की, नराच्या हे त्याच्या आवाजावर अवलंबून असतं. जर हा पक्षी गुणगुणला तरच मादी त्याच्याकडे आकर्षित होईल नाही तर हा पक्षी दुसऱ्या नराकडे स्वत:च आकर्षित होईल.