Birthday SPL : कोटींच्या गाड्या अन् दागिने ! ‘एवढ्या’ कोटींचा मालक आहे सनी देओल

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सनी देओल याचा आज 64 वा वाढदिवस आहे. सनी देओल गुरदासपूरमध्ये खासदार आहे. राजकारणात सनी खूप लोकप्रिय आहे. बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे देणारा सनी कोट्याधीश आहे. आज आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त खास त्याच्या प्रॉपर्टीबद्दल माहिती घेणार आहोत.

2019 सालच्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात सनी देओलनं दिलेल्या माहितीनुसार सनी देओल आणि त्याची पत्नी 87.18 कोटी रुपयांची मालक आहे. या प्रतिज्ञापत्रात असं सांगितलं होतं की, त्यांनी 2017-18 मध्ये 63.82 लाख रुपये, 2016-17 साली 96.29 लाख रुपये आणि 2015-16 साली 2.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यांच्याकडे 60.46 कोटी रुपये जंगम संपत्ती आणि 21 कोटी रुपयांची अचल मालमत्ता आहे.

यादरम्यान सनी देओलकडे 26 लाख रुपये कॅश होती त्याची पत्नी लिंडा देओलकडे 16 लाख रुपये होते. त्यात सनी देओलच्या बँकेतील खात्यात 9.36 लाख रुपये आहेत आणि त्यानं 1.43 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. यासोबत त्याच्याकडे 1.69 कोटींची कार आहे. 1.56 कोटींचे दागिने आहेत. 21 कोटींची जमीन आहे. यात अ‍ॅग्रीकल्चर आणि नॉन अ‍ॅग्रीकल्चर असं आहे. मुंबईत एक फ्लॅट आहे.

सनी देओलं 1977-78 मध्ये बर्घिंघमध्ये अ‍ॅक्टींग आणि थिएटरमध्ये डिप्लोमा केला आहे. सनीनं आजवर अनेक हिट सिनेमे दिले आहे. गदर आणि घायल हे त्याचे सिनेमे खूप गाजले आहेत.