Cipla च्या शेअर्संनी काही तासातच दिला 11 % नफा, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – औषध कंपनी सिप्लाच्या शेयरमध्ये सोमवारी 11 टक्के वाढ दिसून आली. कंपनीने 30 जूनला पूर्ण झालेल्या तिमाहीत आपल्या एकत्रित निव्वळ नफ्यात 26.58 टक्के वाढ नोंदल्यानंतर ही उसळी दिसून आली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर कंपनीचा शेयर सोमवारी व्यवसायाच्या दरम्यान 11.78 टक्क्यांच्या वाढीसह 814.45 रुपयांच्या 52 आठवड्याच्या कमाल स्तरावर पोहचला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सुद्धा सिप्लाचा शेयर सोमवारी 814.50 रुपयांच्या स्तरावर पोहचला.

या औषध कंपनीने शुक्रवारी सांगितले होते की, विक्रीतील वाढीमुळे जून तिमाहीत कंपनीने 26.58 टक्के वाढीसह 566.04 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. कंपनीने एक वर्षापूर्वीच समान कालावधीत 447.15 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. सिप्लाने एका बीएसई फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

एप्रिल ते जून तिमाहीत कंपनीला उलाढालीतून एकुण महसूल 4,346.16 कोटी रूपये होता. हा एक वर्षापूर्वी समान कालाावधीत 3,989.02 कोटी रुपये होता.

सिप्लाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि अंतरराष्ट्रीय सीईओ उमंग वोहरा यांनी म्हटले, एप्रिल-जून तिमाहीच्या दरम्यान, आमच्या व्यवसायाने भारत, दक्षिण अफ्रीका आणि अमेरिकेच्या बाजरांमध्ये मजबूत ग्रोथसाठी आपल्या ऑपरेटिंग मॉडल्सबाबत सक्रियदृष्ट्या विचार केला आणि खर्चाच्या सर्वोत्तमीकरणावर लक्ष केंद्रित केले. यातून तिमाहीच्या ईबीआयटीडीए ला 24 टक्केपर्यंत पोहचण्यास मदत झाली. सोबतच त्यांनी म्हटले की, कंपनी आपल्या योजनाबद्ध भागीदारीच्या माध्यमातून कोविड-19 चा सामना करण्यात सुद्धा पुढच्या रांगेत उभी आहे.