जर तुमच्याकडं नसेल ‘हा’ कोड तर घरी नाही मिळणार LPG सिलेंडर, नियमांमध्ये झालेत बदल, जाणून घेणं गरजेचं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    या महिन्यापासून देशातील 100 स्मार्ट शहरांमध्ये लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) च्या वितरणासंबंधित नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. ज्या ग्राहकांनी एलपीजी सिलिंडर बुक केले आहेत त्यांना आता त्यांच्या मोबाइल नंबरवर ओटीपी मिळेल. आपण गॅस वितरण करणाऱ्या मुलाला वन टाइम पासरवर्ड सांगणे गरजेचे आहे कारण ते सांगितल्याशिवाय गॅस मिळणार नाही. ही सिस्टम कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीस प्रतिबंधित करते आणि योग्य ग्राहक ओळखण्यास मदत करेल.

चला मग जाणून घेऊया की, एलपीजी गॅस सिलिंडरच्या विक्रीसंदर्भातील नियमात तेल विपणन कंपन्यांनी काय बदल केले आहेत.

>  तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडर्सच्या होम डिलीव्हरीचा पर्याय निवडलेल्या ग्राहकांसाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) सिस्टम लागू केली आहे. या नवीन ओटीपी-आधारित प्रणालीनुसार, एलपीजी सिलिंडर वितरणासाठी गॅस बुकिंग करणे पुरेसे नाही. या नव्या व्यवस्थेअंतर्गत ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बुकिंग केल्यानंतर मेसेज येईल. आपण हा कोड जेव्हा दाखवाल तेव्हाच गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळेल. तथापि, ही व्यवस्था व्यावसायिक सिलिंडरसाठी लागू नाही.

>  मोबाइल नंबर अपडेट न झाल्यास, डिलिव्हरी व्यक्ती अ‍ॅपच्या मदतीने रिअल टाइममध्ये मोबाइल नंबर अपडेट करुन कोड जनरेट करेल. अशा परिस्थितीत, आपण गॅस सिलिंडर बुक करत असाल तर आपण ते निश्चित केले पाहिजे की, आपला पत्ता आणि मोबाइल नंबर तेल विपणन कंपनीकडे अपडेट केले गेले आहे. हे आपल्याला विविध प्रकारच्या गैरसोयींपासून वाचवेल.

>  दरम्यान, प्रमुख OMC Indian Oil ने देशभरातील इंडेन रिफिल बुकिंगसाठी एक नंबर जारी केला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कंपनीचे ग्राहक आता गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी 7718955555 या कॉमन क्रमांकावर कॉल किंवा एसएमएस करतील.