Independence Day Special Stock Tips : ‘या’ 10 शेयर्समधील गुंतवणूक पुढील स्वातंत्र्य दिनापर्यंत करू शकते तुम्हाला ‘मालामाल’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना संकटाच्या या काळात किरकोळ गुंतवणुकदारांची संख्या खुप वाढल्याचे दिसत आहे. याच दरम्यान मोठ्या संख्येने नव्या गुंतवणुकदारांनी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली आहे. अशा गुंतवणुकदारांचे लक्ष्य संकाटाच्या या काळात बाजारातून काही पैसे कमावण्याचे आहे. मात्र, शेयर बाजारात गुंतवणूक थोडा तांत्रिक विषय आहे आणि अशा प्रकरणात एक्सपर्टचा सल्ला पुढे जाण्यासाठी चांगला ठरतो. जर तुम्ही आर्थिक स्वातंत्र्याबाबत विचार करत असाल तर तुम्ही काही निवडक स्टॉक्सवर लक्ष देऊ शकता. आम्ही तुमच्यासाठी काही अशा शेयर्सची यादी घेऊन आलो आहोत, ज्यांच्याबाबत तमाम एक्सपर्ट आशादायक आहेत.

सीएनआय रिसर्चचे सीएमडी किशोर ओस्तवाल यांच्यानुसार, पुढील एक वर्ष इकॉनॉमी आणि बाजाराच्या दृष्टीने खुप महत्वाचे असणार आहे. जाणून घेवूयात ओस्तवाल यांच्यानुसार कोणत्या शेयर्समध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते…

1. एचडीएफसी लाईफची सध्याची किंमत 600 रुपयांच्या जवळपास आहे. याचे टार्गेट 1,200 रुपयांचे आहे, कारण इन्श्युरन्स सेक्टरचा विस्तार होत आहे.

2. भारती एयरटेलच्या शेयरचा सध्याचा भाव 525 रुपयांच्या जवळपास आहे आणि तो 950 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. प्रति यूजर सरासरी उत्पन्नात कंपनीच्या स्टॉकसाठी चांगले आहे.

3. बजाज कंझ्यूमर्सच्या शेयर्सची सध्याची किंमत 180 रुपये आहे. याचे टार्गेट 300 रुपयांचे आहे.

4. टाटा मोटर्सच्या शेयर्सची सध्या किंमत 125 रुपयांच्या जवळपास आहे. यासाठी 250 रुपयांचे टार्गेट आहे, कारण कंपनी आपल्या कोर बिजनेसवर खुप लक्ष देत आहे. टाटा मोटर्ससाठी इलेक्ट्रिक वाहन फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकतो.

5. विपुल ऑर्गेनिक्सचा सध्याचा भाव 125 रुपयांच्या जवळपास आहे. यासाठी आम्ही 250 रुपयांचे टार्गेट ठरवले आहे. कारण कंपनीने नुकताच आपल्या क्षमतेत सहापट विस्तार केला आहे. येत्या तिमाहीत याचा परिणाम दिसून शकतो.

6. आयआयएफएलचा सध्याचा भाव 70 रुपयांच्या जवळपास आहे. याचे टार्गेट 150 रुपयांचे आहे, कारण याचे एक्सपोजर गोल्ड लोनसाठी सुद्धा आहे. गोल्ड लोन या स्टॉकसाठी चांगले आहे.

7. आयडीयाच्या शेयरचा सध्याचा भाव 9 रुपयांच्या जवळपास आहे. यासाठी 30 रुपयांचे टार्गेट आहे.

8. इंडियाबुल्स हौसिंग फायनान्सच्या शेयर्सचा भाव 200 रुपयांच्या जवळपास आहे. यासाठी आम्ही 400 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. कारण अपोलो यूएसए कंपनीचे अधिग्रहण करत आहे.

ट्रान्सेंड कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर (वेल्थ मॅनेजमेंट) कार्तिक झवेरी यांच्यानुसार या स्टॉक्समध्ये गुंतवणूक फायद्याचा सौदा ठरू शकतो…

1. सन फार्मा

असे दिसते की, या कंपनीचा वाईट काळ आता संपला आहे. येणार्‍या अनेक वर्षात कंपनीत ग्रोथ दिसणार आहे.

2. सिप्ला

ही फार्मा सेक्टरची आणखी एक दिग्गज कंपनी आहे आणि जेनरिक मार्केटमध्ये सुद्धा खुप सक्रिय आहे.

3. वैभव ग्लोबल

टीव्ही शॉपिंगचे वेगळे बिझनेस मॉडल या कंपनीकडे आहे आणि जागतिक संकटाचा या कंपनीवर कोणताही खास परिणाम दिसणार नाही.

4. टाटा कंझ्यूमर

ही कंपनीत भविष्यात ग्रो करताना दिसत आहे.

5. आयटीसी

ही कम्प्लीट पॅकेजसोबत येणारी कंपनी आहे. ही कंपनी अनेक वर्षांच्या खालच्या स्तरावरून आता वर येताना दिसत आहे.

6. लार्सन अँड टूब्रो

भारतात इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरचा विस्तार होईल, जो पाहता या कंपनीचे भविष्य प्रॉस्पेक्ट चांगले दिसत आहे.

7. एचडीएफसी बँक

अन्य बँकांच्या तुलनेत हिचा लोन पोर्टफोलियो चांगला आहे. सोबतच सॅलरी अकाऊंट होल्डर्सचा बेससुद्धा चांगला आहे.

8. हीरो मोटोकॉर्प

पर्सनल मोबिलिटीवर खुप जास्त लक्ष असल्याने ग्रामीणसह शहरी बाजारात कंपनीची ग्रोथ खुप चांगली होण्याची आशा आहे.

9. यूपीएल

कृषी क्षेत्रात ही कंपनी चांगला बिझनेस करत आहे.

10. सुदर्शन केमिकल्स

कंपनीची बाजारात स्थिती खुप मजबूत आहे आणि ग्रोथ कायम राहण्याची आशा आहे.

एसएमसी ग्लोबल सीक्युरिटीज लिमिटेडचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडन्ट- रिसर्च (रिटेल इक्विटीज) सौरभ जैन यांच्यानुसार, पुढील एक वर्षाचे लक्ष्य घेऊन चालणार्‍या गुंतवणुकदारांना आयटी आणि फार्मा स्टॉक्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. आपला पोर्टफोलियो डायव्हर्सीफाय करण्यासाठी एफएमसीजी सेक्टरच्या सुद्धा काही स्टॉकची निवड करू शकता. गुंतवणूकदार एचसीएल टेक्नॉलॉजीस, टेक महिंद्रा, एलेम्बिक फार्मास्यूटिकल, लॉरस लॅब्ज, यूपीएल लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक आणि कोलगेट सारख्या स्टॉक्समध्ये गुंतवणुकीद्वारे चांगले पैसे बनवू शकता.

(शेअर्सबाबतचा हा सल्ला जाणकारांनी दिला आहे. या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी तुमच्या गुंतवणूक सल्लागारचा सल्ला आवश्य घ्यावा. कोणत्याही प्रकारच्या नफा-तोटयाची जबाबदारी पोलीसनामा ऑनलाइनवर असणार नाही.)