विमा कंपन्यांना ग्राहकांचं व्हिडीओ आधारित ऑनलाईन KYC करण्यास IRDAI नं दिली परवानगी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   विमा क्षेत्रातील सरकारी नियामक संस्था IDRAI ( Insurance Regulatory and Development Authority) ने सोमवारी ग्राहकांच्या व्हिडिओ-आधारित ओळख प्रक्रियेद्वारे (व्हीबीआयपी) जीवन व सामान्य विमा कंपन्यांना केवायसीला परवानगी दिली. व्हीबीआयपी या प्रक्रियेमुळे कोरोना काळात कंपन्यांच्या अधिकाऱ्याना ऑनलाइन अनिवार्य गरजा पूर्ण करण्यास मदत केली जाईल.

याबद्दल विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आयआरडीएने म्हटलं आहे की, ग्राहक केवायसी प्रक्रिया सुलभ करणे आणि तसेच ही सेवा ग्राहकांना अनुकूल बनविण्यासाठी विविध इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मचा लाभ घेणे हे VIBP चं उद्दीष्ट आहे.

यामध्ये होणाऱ्या KYC बद्दल नियामकाने सांगितले की, विमा कंपन्या एक अर्ज तयार करुन थेट व्हीबीआयपी करू शकतात, ज्यामध्ये केवायसीची प्रक्रिया व्हिडिओद्वारे फेस टू फेस पडताळणी केली जाईल. आयआरडीएने एका परिपत्रकात म्हटले आहे की, याचा उपयोग खाते-आधारित संबंध स्थापित करण्यास किंवा स्वतंत्र ग्राहक किंवा लाभार्थींसह कोणत्याही इतर सेवेसाठी करता येईल.

आयआरडीएने पुढे नमूद केले आहे की व्हीबीआयपीच्या आधारे उघडलेली सर्व खाती आणि सेवा विमा कंपनीने चांगल्या पडताळणीनंतरच कार्यान्वित केली पाहिजेत जेणेकरुन सेवेची अखंडता अबाधित राहू शकेल.

‘सुरक्षा, मजबुती आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुनिश्चित करण्याव्यतिरिक्त, विमा कंपन्या सॉफ्टवेअरचा वापर करतील आणि व्हीबीआयपी ऍप्लिकेशनची सुरक्षा ऑडिटही घेतील.’ असंही IRDAI ने सांगितलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like