LIC च्या पॉलिसीधारकांसाठी चांगली बातमी, आता 30 जून पर्यंत ऑनलाइन सबमिट करा क्लेमची कागदपत्रे, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूच्या साथीमुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) ने मॅच्युरिटी क्लेम आणि सर्वायवल बेनिफिटच्या लाभांमध्ये सूट देण्यात आली आहे. एलआयसीने आपल्या वेबसाइटवरील अधिसूचनेत म्हटले आहे की, पॉलिसीधारक त्यांचे क्लेम डॉक्युमेंट ईमेलद्वारे पाठवू शकतात. एलआयसी वेबसाइटवर दिलेल्या अधिसूचनेनुसार केवायसी फॉर्म इ. सारखी स्कॅन केलेली पॉलिसीची कागदपत्रे 30 जूनपर्यंत शाखेत पाठविली जाऊ शकतात.

–  स्कॅन केलेल्या प्रती 5 एमबीपेक्षा जास्त नसाव्यात.
–  मेल वर claims.bo @licindia.com वर पाठवावे.
–  जर अटॅचमेंट फाईल 5 एमबीपेक्षा जास्त असेल तर एकापेक्षा जास्त मेल पाठवावे लागतील.
–  स्कॅन केलेले दस्तऐवज जीपीजी किंवा पीडीएफमध्ये असले पाहिजेत आणि वाचनीय असले पाहिजे.
–  मेलचा विषय पॉलिसी क्रमांक असावा.

या सुविधेचा फायदा घेण्यासाठी काही अटींचे पालन करणे गरजेचे आहे

–  चालू पॉलिसी
–  पॉलिसीची सेवा त्या शाखांमधून घेतली जात आहे, जेथून ते जारी केली जात आहे.
–  अश्या पॉलिसी ज्यावर कोणतेही कर्ज नाही.
–  जेथे डुप्लिकेट पॉलिसी दिलेली नाही
–  मुख्य व्यक्ती विमा, नियोक्ता कर्मचारी योजना किंवा एमडब्ल्यूपी कायद्यांतर्गत जारी केलेली पॉलिसी
–  सर्व्हायवल क्लेम बेनिफिट्सच्या बाबतीत, एसबीची एकूण रक्कम 5 लाखांपर्यंत असावी
–  मॅच्युरिटी क्लेम असल्यास पॉलिसीची विमा रक्कम 5 लाखांपर्यंत असावी .

सवलत

–  खालील आवश्यकता ईमेलद्वारे प्राप्त केल्या जाऊ शकतात. पॉलिसी धारकाद्वारे वर नमूद केल्यानुसार स्कॅन केलेल्या प्रती ई-मेलवर पाठविल्या जातील.
–  पॉलिसी बाँडचे पहिले आणि शेवटचे पृष्ठ
–  पुराव्यांसह पूर्णपणे भरलेला डिस्चार्ज फॉर्म
–  गैर – असाइनमेंट संदर्भात फॉर्म क्रमांक 3510 घोषणा
–  जेथे एनईएफटी नाही, तेथे रद्द चेकसोबत NEFT मेंडेट फार्म
–  केवायसी दस्तऐवज म्हणजे पॅन कार्डसह आयडी प्रूफ आणि पत्त्याचा पुरावा
–  पॉलिसीधारकाने आपल्या ईमेलमध्ये आपला मोबाईल नंबर लिहावा
–  सर्व्हायवल लाभासाठी ही रक्कम दोन लाखांपेक्षा जास्त असल्यास पॉलिसी बाँड सबमिट करावा लागेल.
–  मॅच्युरिटी क्लेमसाठी जिथे विस्तारित लाइफ कव्हर उपलब्ध आहे, नंतर डिस्चार्ज फॉर्मसह पॉलिसी बाँड सबमिट करावा लागेल
–  इतर सर्व मॅच्युरिटी क्लेमसाठी पॉलिसी बाँड रद्द करावा आणि नंतर डिस्चार्ज फॉर्मसह ऑफिसला सादर करावा.