खुशखबर ! ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात सलग चौथ्या दिवशी ‘घसरण’, 20 पैशांनी झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलचे दर घटल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर रविवारी आणखी स्वस्त झाले. इंडियन ऑईलने पेट्रोलच्या दरात 19 पैसे आणि डिझेलच्या दरात 20 पैशांची कपात केली आहे. कोरोना व्हायरसमुळे अंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर घटल्याने क्रुड ऑईलच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल शनिवारच्या तुलनते 19 पैसे प्रति लीटर स्वस्त झाले आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर रविवारी 12 डिसेंबर 2019 च्यानंतर सर्वात खालच्या स्तरावर पोहचले आहेत. तर, डिझेलसुद्धा 12 जानेवारी 2019 च्यानंतर सर्वात स्वस्त मिळत आहे.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर
पुणे 76.61 – 65.54
अहमदनगर 76.57 – 65.53
औरंगाबाद 77.19 – 66.12
धुळे 76.85 – 65.80
कोल्हापूर 77.45 – 66.39
नाशिक 76.70 – 65.65
रायगड 76.27 – 65.20

महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
आज तुम्ही 70.83 रुपये प्रति लीटर दराने पेट्रोल खरेदी करू शकता. तर, डिझेलसुद्धा 18 पैसे स्वस्त झाले असून ते 63.51 रुपये प्रति लीटर मिळत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. येथे पेट्रोल 18 टक्के स्वस्त झाले असून 76.53 रुपये प्रति लीटर मिळत आहे. तर, डिझेल 19 पैसे स्वस्त होऊन 66.50 रुपये प्रति लीटर झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 19 पैसे प्रति लीटर कमी झाले असून 73.51 रुपये प्रति लीटर दराने मिळत आहे. डिझेलचा दर 65.84 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 20 पैसे प्रति लीटरची कपात झाली आहे. येथे पेट्रोल 73.58 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 67.01 रुपये प्रति लीटर मिळत आहे.