Pension Scheme : PFRDA किमान रिटर्नची हमी देणारी पेन्शन योजना करणार सादर, हा होणार फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) किमान रिटर्नची गॅरंटीवाली पेन्शन योजना सादर करण्याची तयारी करत आहे. तिचे अध्यक्ष सुप्रतिम बंदोपाध्याय यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटले की, प्राधिकरण किमान गॅरंटीवाली पेन्शन स्कीम सादर करण्याच्या तयारीला लागले आहे. पेन्शन प्राधिकरण यासंबंधी पेन्शन फंड आणि अ‍ॅक्चुरियल फर्मसोबत चर्चा करत आहेत. या चर्चेच्या आधारावर प्रस्तावित योजनेची रूपरेषा तयार केली जाईल.

त्यांनी म्हटले, ’पीएफआरडीए कायद्यांतर्गत आम्हाला एक किमान ठोस रिटर्नची योजना सुरू करण्याची परवानगी आहे. पेन्शन फंड (पीएफ) योजनांतर्गत, प्रबंधित कोष बाजार आधारित आहे. यासाठी जाहिर प्रकारे काही चढ-उतार होतात आणि मुल्यांकन बाजारावर अवलंबून असते.

बंदोपाध्याय यांनी म्हटले की, यासाठी काही असे लोक असू शकतात, ज्यांना किमान ठोस रिटर्न हवे असेल. यासाठी आम्ही आपल्या पेन्शन फंड व्यवस्थापक आणि काही एक्चुरियल फर्मसोबत काम करत आहोत की किमान गॅरंटीचा आदर्श स्तर काय असावा, जो देता येईल. शिवाय, गॅरंटी बाजारशी संबंधित असेल कारण फंड व्यवस्थापकांनाच गुंतवणुकीवर प्रतिफळाच्या गॅरंटीकृत भाग ठरवावा लागेल.

त्यांनी म्हटले की, तुम्ही पाहता, एनपीएस आणि एपीवाय अशी उत्पादने आहेत जी (अर्थ) मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार बनवण्यात आली आहेत. मात्र, पीएफआरडीएने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) योजनेत अनेक सुविधा जोडल्या कारण मुळ उत्पादनाची कल्पना सरकारद्वारे करण्यात आली होती आणि प्राधिकरणाने उत्पादन बनवण्यात मदत केली होती. अटल पेन्शन योजने (एपीवाय) च्या प्रकरणात सुद्धा असेच आहे.