फर्निचर आणि दूधाच्या व्यवसायात उतरू शकतं रिलायन्स, कराराबाबत बातचीत सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड आपला ई-कॉमर्स व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी ऑनलाइन फर्निचर किरकोळ विक्रेता अर्बन लॅडर आणि दुध वितरण कंपनी मिल्कबास्केट खरेदी करण्यासाठी चर्चा करीत आहे. माहितीनुसार अर्बन लॅडर खरेदी करण्यासाठी मूख्य स्तरावर चर्चा सुरू आहे. या कराराची किंमत सुमारे 30 मिलीयन डॉलर्स असू शकते. दरम्यान, रिलायन्स, अर्बन लेडर आणि मिल्कबास्केटने या संबंधित माहिती देताना कोणताही प्रतिसाद दर्शविला नाही.

दरम्यान, कोविड -19 साथीच्या आजारामुळे बरेच भारतीय घराबाहेर पडण्याऐवजी घरीच सामान ऑर्डर करण्याची सोय शोधत आहेत. आता किराणा सामानाचीही होम डिलिव्हरी करण्याची मागणी वाढली आहे.

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्सने मे महिन्यात ऑनलाईन किराणा दुकान JioMart लाँच केले. प्रतिस्पर्धी अ‍ॅमेझॉन डॉट कॉम आणि वॉलमार्ट इंक. आणि फ्लिपकार्ट सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करणे हे यामागील उद्दीष्ट आहे. अलीकडच्या काळात अंबानींच्या संपत्तीत 20 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त भर पडली आहे.