भाजपा अध्यक्ष पद निवडीचा कार्यक्रम ठरला, स्पर्धेत एकटेच जेपी नड्डा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गृहमंत्री अमित शाह यांच्यानंतर भाजपचे नवे अध्यक्ष निवडले जाणार आहेत. यासाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया 20 जानेवारी सकाळी 10 वाजता सुरु होईल. विशेष म्हणजे या रेसमध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा हे एकटेच आहेत. अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज करण्याची वेळ 20 जानेवारीला सकाळी 10 ते 12.30 दरम्यान असेल.

उमेदवारी अर्जाची तपासणी त्याच दिवशी 12.30 पासून 1.30 वाजेपर्यंत होईल. तर 1.30 ते 2.30 दरम्यान अर्ज परत घेता येणार आहे. भाजपचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांच्यामते कोणा दुसऱ्याचे नाव आले तर 21 जानेवारीला सकाळी 10 वाजता निवडणूक होईल, परंतु पक्षाकडून अद्यापही कोणत्याही नेत्याचे नाव समोर आलेले नाही. त्यामुळे निवडणूक फक्त औपचारिकता म्हणून घेतली जाणार आहे असे दिसते. त्यामुळे शक्यता आहे की 20 जानेवारीला जे पी नड्डा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर ते 22 जानेवारीला अध्यक्ष पद संभाळतील.

image (13)

राधामोहन सिंह म्हणाले की, भाजपच्या निवडणूक कार्यक्रमात प्रक्रिया पहिल्या टप्प्यात 75 टक्के बूथ समितीचे गठन करण्यात आले आहे. 50 टक्के मंडळ समित्यांचे गठन झालेले आहे. 21 प्रांतांच्या प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडणूका झालेल्या आहेत.

2014 च्या निवडणूकीमध्ये भाजपचा मोठे यश आल्यानंतर अमित शाहांचे भाजप अध्यक्ष बनवण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत ते या पदावर आहेत. 2019 मध्ये भाजपला लोकसभा निवडणूकीत मोठे यश मिळाले आणि अमित शाह गृहमंत्री झाले. त्यामुळे भाजप आता आपला नवा अध्यक्ष बसवण्याच्या तयारीत आहे. भाजपचे सध्या कार्यकारी अध्यक्ष असलेले जे पी नड्डा अध्यक्ष पदावर विराजमान होतील अशी शक्यता आधिक आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/