शरद पवार यांच्यावर ‘टीका’ करणार्‍या पडळकरांना भाजपानं दिली आणखी एक मोठी जबाबदारी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या महिन्यातच भाजपकडून विधानपरिषदेचे आमदार झालेल्या गोपीचंद पडळकरांना लॉटरी लागली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील टीकेमुळे पडळकरांचा फायदा झाल्याचे दिसत आहे. भाजपने आज त्यांना थेट पश्चिम महाराष्ट्राच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती केली. लोकसभेनंतर भाजपवासी झालेले कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनाही पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्तेपद देण्यात आले आहे. मुख्य प्रवक्ता म्हणून गेल्या महिन्यातच केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आज 10 प्रवक्ते आणि 33 पॅनल सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

मुख्य प्रवक्ता – केशव उपाध्ये

प्रवक्ता
1. खासदार भारती पवार – उत्तर महाराष्ट्र
2. आमदार गोपीचंद पडळकर – पश्चिम महाराष्ट्र
3. शिवराय कुलकर्णी – विदर्भ
4. एजाज देशमुख – मराठवाडा
5. भालचंद्र शिरसाट – मुंबई
6. धनंजय महाडीक – पश्चिम महाराष्ट्र
7. राम कुलकर्णी- मराठवाडा
8. श्वेता शालिनी – पुणे
9. ॲड. राहुल नार्वेकर – मुंबई
10. आमदार राम कदम – मुंबई

पॅनेलिस्ट म्हणून नियुक्ती केलेले सदस्य
गणेश हाके, अतुल शाह, आमदार गिरीश व्यास, अवधूत वाघ, शिरीष बोराळकर, सुनील नेरळकर, सुधीर दिवे, डॉ. अनिल बोंडे, आमदार अमित साटम, प्रवीण घुगे, रिदा रशीद, गणेश खणकर, मकरंद नार्वेकर, विनायक आंबेकर, शेखर चरेगांवकर, श्वेता पुरुळेकर, आमदार सुरेश धस, प्रदीप पेशकार, आमदार निरंजन डावखरे, लक्ष्मण सावजी, आरती पुगावकर, आरती साठे, राजीव पांडे, दिपाली मोकाशी, नितीन दिनकर, धर्मपाल मेश्राम, किशोर शितोळे, प्रेरणा होनराव, शिवानी दाणी, स्वानंद गांगल, आनंद राऊत, राम बुधवंत, प्रीति गांधी.