पूजा चव्हाण आत्महत्या प्रकारण : संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – अतुल भातखळकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारणात अनेक उलट सुलट चर्चा सुरू आहे. तर या प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि भाजप एकेमेकांवर जुंपली आहे. मूळची बीडमधील परळी येथील असणारी पूजा चव्हाण (वय २२) या तरुणीने इमारतीवरून उडी मारून पुण्यात आत्महत्या केली. तर या आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. तर आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आले आहे. यावरून भाजप पक्ष आक्रमक झालेला आहे. अशी मागणी भाजपकडून होत आहे. यावर भाजपचे अतुल भातखळकर यांनी आक्रमक होत, प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपकडून होत आहे. तर भाजपाचे अतुल भातखळकर हे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, ठाकरे सरकार मधील मंत्री संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. तसेच या राज्यात महिला सुरक्षित तर नाहीत. पण राज्यातील महिला या मंत्र्यांपासूनसुद्धा सुरक्षित नाही आहेत असं देखील म्हटलं आहे. तसेच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करावी. या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती, पोलीस अधिकारी असावेत, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

पुढे भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत, म्हणाले, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. या प्रकरणात समोर आलेल्या ऑडिओ क्लीप ताब्यात घेतल्या पाहिजेत. त्या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिककडे पाठवून तो आवाज कोणाचा आहे? हे तपासलं पाहिजे. लॅपटॉही स्कॅन केला पाहिजे. या सर्व तपासाच्या गोष्टी असून, गुन्हेगारांना वाचवण्याचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करताहेत, असा गंभीर आरोप भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.