साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, यांनी माफी मागावी : भाजप

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. नथुराम गोडसे देशभक्त होते, आहे आणि राहील असे विधान त्यांनी केले आहे.

भाजप प्रवक्ते जी. व्ही. एल नरसिंह राव म्हणाले कि, ‘प्रज्ञा सिंह यांच्या मताशी भाजप सहमत नसून आम्ही त्याचा निषेध करतो. याबाबत भारतीय जनता पार्टी प्रज्ञा सिंह यांना स्पष्टीकरण मागेल. या वादग्रस्त विधानाबाबत प्रज्ञा सिंह यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली पाहिजे’.

नथुराम गोडसेला दहशतवादी म्हणणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण केल पाहिजे. अशा लोकांना जनता सडेतोड उत्तर देईल, असे देखील साध्वी प्रज्ञा म्हणाल्या.आहेत.

दरम्यान,अभिनेता कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असे म्हंटले होते. त्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवरच साध्वी प्रज्ञा यांना गोडसेबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. या विधानाबाबत साध्वी यांच्यावर चहू बाजूंनी टीका होत आहे. या आधी देखील त्यांनी शहिद हेमंत करकरे यांना देशद्रोही ठरवले होते.

Loading...
You might also like