चंद्रकांत पाटलांची मतदान केंद्रावरच ‘या’ पक्षाच्या विरोधी उमेदवाराला ‘ऑफर’ !

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाल्यानंतर आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असून विविध उमेदवारांनी देखील आपापल्या मतदारसंघात जाऊन मतदान केले. मात्र पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात आज उमेदवारालाच उमेदवाराने पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची घटना घडली आहे.

पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात आज भाजपचे उमेदवार व प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मनसेचे किशोर शिंदे यांना थेट पक्षप्रवेशाची ऑफर दिली. मात्र शिंदे यांनी ती धुडकावून लावली. त्यामुळे सध्या पुण्यात या प्रकरणाची मोठी चर्चा होत आहे. उमेदवार आपल्या मतदारसंघात विविध ठिकाणी फिरून मतदानाचा आढावा घेत असतात. त्याप्रमाणे उमेदवार व प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी देखील आपल्या कोथरूडमधील एका मतदान केंद्राला भेट दिली.

त्यावेळी तेथे त्यांची किशोर शिंदे यांच्याशी भेट झाली. यावेळी त्यांच्यात खेळीमेळीची चर्चा झाली. यावेळी पाटील यांनी शिंदे यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली. त्यावर शिंदे यांनी आधी मेधा कुलकर्णी व मुरली मोहोळ यांच्याकडं लक्ष द्या, अशी सूचना पाटलांना केली. चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असून ते यावेळी पुण्यातून निवडणूक लढवत असून त्यांना विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी तिकीट दिले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदारसंघात त्यांना विरोध देखील झाला होता. दरम्यान, आज 288 ठिकाणी मतदान पार पडत असून राज्यात 8 कोटी 95 लाख 62 हजार 706 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Visit  :Policenama.com

You might also like