‘U – टर्न’ला आता उद्धवजी ‘टर्न’ म्हंटल पाहिजे : चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकऱ्यांची कर्जमाफी ही एक फसवणूक आहे, उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही अशा शब्दात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दावरून यु टर्न मारला आहे अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

२००१ ते २०१६ या कालावधीतील दोन लाखापर्यंतचं कर्ज असलेला शेतकरीच कर्जमाफी देण्यासाठी राहिलेला नाही. आता फक्त दोन लाखावरचे शेतकरी राहिले आहेत आणि यांना कर्जमाफी दिली जाणार नाही आहे. त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजे फसवणुक आहे अशी टीका पाटील यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीबाबत जो युटर्न मारला आहे तो उद्धवजी टर्न आहे कारण ते प्रत्येक गोष्टीत टर्न मारतात. सत्तेत आल्यावर मर्यादा असतात हे मेनी परंतु त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा करण्याचे आश्वासन दिले होते अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

पंकजा मुंडे किंवा इतर आमच्या पक्षातील नेत्यांना ऑफर देणाऱ्यांनी आधी त्यांच्या पक्षातील लोकांची काळजी करावी तसेच पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांची नाराजी पक्षावर नाही तर ती एखादा व्यक्ती किंवा घटनेबद्दल आहे आणि ही नाराजी एकत्र बसून मांडायची असते असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/