पुण्याच्या जागांवरून युतीत ठिणगी पडणार ? पुण्यातील सर्व जागांवर भाजपचा दावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युतीमध्ये पुण्यातील जागांवरून ठिणगी पडण्याची शक्यता आहे. मागच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपाने पुण्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच 8 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपाने यंदाच्या निवडणुकीत पुण्यातील सर्व जागांवर दावा केला आहे. भाजपच्या या दाव्यामुळे भाजपा-शिवसेना युतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याला काही दिवस राहले आहेत. भाजप-शिवसेना युतीचं पक्क झालं असताना जागा वाटपावरून या दोन्ही पक्षात ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज पुण्यामध्ये इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. सर्व 8 जगांसाठी भाजप मुलाखती घेत असून सर्व जागा भाजपलाच मिळाल्या पाहिजेत असे मत माधुरी मिसळ यांनी व्यक्त केले आहे. पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय बंधनकारक असला तरी पुण्यातील सर्व जागा भाजपलाच मिळाव्या असा आग्रह स्थानिकांचा असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील 8 जागांसाठी भाजपच्या मुलाखती सुरु झाल्या आहेत. आज झालेल्या मुलाखतींमध्ये 8 जागांसाठी 103 जणांनी मुलाखती दिल्या आहेत. दरम्यान, स्वबळावर लढलं तर भाजपला बहुमत मिळेल असे काही सर्व्हेमध्ये स्पष्ट झाल्याने भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचे बोलले जाऊ लागलेय. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली भूमीका स्पष्ट केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती ठरली असून त्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होण्याचा प्रश्नच नाही असे म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –