भाजपवर ‘नाराज’ असलेल्या ‘या’ दिग्गज नेत्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून ‘ऑफर’, मंत्रिपद मिळणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काल परळीत गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त मोठा मेळावा पार पडला, यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रकाश मेहता यांच्यासह भाजपचे अनेक आजी माजी खासदार उपस्थित होते. यावेळी एकनाथ खडसेंनी भाजप नेतृत्वार जोरदार हल्लाबोल केला. यानंतर पक्ष नेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. परंतू यानंतर खडसेंना आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून ऑफर असल्याचे सांगण्यात येत आहे.

परंतू आता पक्ष नेतृत्व खरच खडसेंच्या बंडामुळे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. खडसे नाराज असल्याने त्यांनी मागील काही दिवसांपासून पक्षा विरोधात भूमिका अनेकदा मांडली. रोहिणी खडसे यांना पडण्यात आल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले. त्यानंतर काल त्यांनी राज्यातील भाजप नेतृत्वाला निशाणा बनवले. यानंतर आता पक्षात आता खडसेंचे पुनर्वसन अवघड असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून खडसेंचे स्वागत होत असल्याचे वृत्त आहे. असे असले तरी त्यांना मंत्रिपदांची हमी देण्यात आलेली नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंचे राजकीय भवितव्य काय यावर मात्र प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. असे असले तरी कालच्या मेळाव्यात पक्ष सोडण्याचे संकेत देत एकनाथ खडसे म्हणाले की माझा काही भरवसा नाही. यानंतर आता ते भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहेत. परंतू राष्ट्रवादी का शिवसेना यापैकी कोणत्या पक्षात ते जाणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like