BJP leader Murder in Nagpur | भाजप पदाधिकाऱ्याच्या हत्येने नागपुर हादरले! धाब्यावरील कर्मचाऱ्यांनी हत्या केल्याचा संशय

नागपूर : BJP leader Murder in Nagpur | सध्या राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण खुपच वाढले असून खून आणि इतर गुन्हे सातत्याने घडत आहेत. आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नागपुरात त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याची हत्या (BJP leader Murder in Nagpur) झाली आहे. या घटनेने नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे.

राजू डेंगरे असे खून झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव असून ते नागपूरच्या पांचगाव येथील रहिवाशी होते. काल मध्यरात्री त्यांची हत्या झाली. त्यांचा मृतदेह विहिरगाव परिसरात आढळून आला.

राजू डेंगरे यांचा मृतदेह विहिरगाव परिसरात पडला असल्याचे पहाटे तीन वाजता पोलिसांना समजले.
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.
त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आला. राजू डेंगरे यांच्या हत्येचे वृत्त सर्वत्र पसरताच भाजपा नेते, कार्यकर्ते यांनी रूग्णालयात गर्दी केली होती. (BJP leader Murder in Nagpur)

राजू डेंगरे यांचा धाबा असून या धाब्यावरील कर्मचाऱ्यांनीच त्यांची हत्या केली असावी असा प्राथमिक संशय आहे.
तर डेंगरे हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले होते.

या खूनाचा तपास कुही पोलीस करत आहेत. राजू डोंगरे यांची हत्या झाल्याने नागपूरात शहरात खळबळ उडाली आहे.
राजकीय वैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी कुही पोलीस ठाण्यात (Kuhi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eknath Khadse | ‘…तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं,’ एकनाथ खडसे यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार

Maratha Reservation | १ डिसेंबरपासून साखळी उपोषण, पण शांततेत करा, नेत्यांच्या फराळ कार्यक्रमाला जाऊ नका : जरांगेंचे आवाहन

MPSC Recruitment | भरतीच होत नसल्याने ‘एमपीएससी’ची रिक्त पदे गेली २ लाखांवर, बॅकलॉक भरायचा कसा? आयोग त्रस्त