‘उद्धव ठाकरेंचं भाषण वाया गेलेल्या मुलाच्या चिडलेल्या बापाच्या भाषणासारखं होतं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांनी दसरा मेळाव्यातून अप्रत्यक्षपणे राणे कुटुंबीयांवर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राणेंना बेडुकाची उपमा दिल्यानंतर नारायण राणे (narayan rane) यांचे चिरंजीवांनी टीकेची तोफ डागली आहे. नारायण राणे यांची बेडकाशी तर त्यांच्या दोन मुलांची बेडकाच्या पिलांशी तुलना केल्यानंतर निलेश राणे (nilesh rane) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आव्हान (challange) दिलं आहे.

उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे वाया गेलेल्या मुलाच्या थकलेल्या आणि चिडलेल्या बापाचं भाषण होतं, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तसेच मंत्री आदित्य ठाकरेंचं नाव आम्ही घेतलं नव्हतं, ते स्वत:च स्पष्टीकरण देत आहेत, मुलगा-वडील स्वत:च सांगत आहेत, आदित्य ठाकरे श्रावण बाळ आहे, असा टोला देखील नितेश राणे यांनी केला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ठाकरे पिता-पत्रावर हल्ला चढवला. तसेच आज सायंकाळी नारायण राणे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या टीकेला राणे कुटुंब कसे प्रत्युत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ते म्हणाले, नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल एक वाक्य, पण बिहारवर 20 मिनिटं. उद्धव ठाकरे हे धमकी कोणाला देतायेत, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहेत आणि होऊन जाऊदे एकदा.. तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो, अशी टीका करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.

श्रावणबाळ जन्माला घातला का ?

दुसऱ्यांची ‘पिल्ल’ वाईट. मग यानी काय त्या दिनोच्या खुशीत नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा ‘श्रवणबाळ’ जन्माला घातला आहे का ? इतकी खुमखुमी आहे ना मग ती Disha salain ची केस मुंबई पोलिसांवर कुठला ही दबाव न टाकता नि:पक्षपाती चौकशी करुन द्या. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते ! असे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

You might also like