‘संबितजी लक्षात ठेवा 20 लाख कोटीमध्ये 13 झिरो असतात’, भाजपा नेत्यानं डिलीट केलं ‘ट्विट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशातील कोरोना महामारीमुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभं करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर भाजपचे माजी खासदार शरद त्रिपाठी यांनी भाजपचेच प्रवक्ते संबित पात्रा यांना चिमटा काढत एक ट्विट केलं. ‘ संबितजी लक्षात ठेवा, 20 लाख कोटीमध्ये 13 शून्य असतात,’ असं ट्विट त्रिपाठींनी केलं होतं.

नंतर लगेचच हे ट्विट डिलिट केली. त्रिपाठींनी नव्या ट्विट लिहिलं की, ‘संबितजी लक्षात ठेवा, 20 लाख कोटीमध्ये 13 शून्य असतात, नाहीतर उद्यापासून अनेकजण सारखंसारखं हेच विचारून चर्चा भरकटवतील.’ त्रिपाठींनी दुसऱ्या ट्विटच्या माध्यमातून सारवासारव केली.