Video : सुधीर मुनगंटीवारांनी शेअर केला ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील व्हिडीओ ! दिला ‘खास’ मेसेज

पोलिसनामा ऑनलाइन – अनेक मुलांना असं वाटत असतं की, पालक आपल्यासाठी कुठे जास्त काय करत असतात. खास करून आई एवढं करते तरीही काहींनी त्याची किंमत नसते. एका मराठी मालिकेचा व्हिडीओ शेअर भाजप नेते आणि माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याच विषयावर भाष्य केलं आहे. त्यांना भावलेला मालिकेतील एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी एका मालिकेतील व्हिडीओ शेअर करत आईची महती सांगितली आहे. फेसबुकवरून त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. झी मराठी वाहिनीवरील अग्गंबाई सासूबाई या मालिकेमधील हा व्हिडीओ आहे.

व्हिडीओ शेअर करताना मुनगंटीवार यांनी खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये ते म्हणतात, “जेव्हा घरात भाकरीचे 4 तुकडे असतात आणि खाणारी तोंड 5 असतात. तेव्हा घरात एकच व्यक्ती अशी असते जी मला भूक नाही असं म्हणते. ती म्हणजे आई.”

सुधीर मुनगंटीवार यांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. अनेकांनी ही पोस्ट शेअरही केली आहे. काही नेटकऱ्यांनी तर यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे. अनेकांना ही पोस्ट भावली आहे.