गडकरींच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव 

नागपूर :  पोलीसनामा ऑनलाईन 

नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मुळगावात आणि दत्तक घेतलेल्या गावातही भाजपचा दारूण पराभव झाला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4aa1f164-c24c-11e8-8e80-c9786828c323′]

नितीन गडकरींचे मुळगाव असलेल्या धापेवाडा इथं ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस समर्पित सरपंचपदाचे उमेदवार सुरेश डोंगरे विजयी झाले आहे. याठिकाणी काँग्रेसचे १६ तर भाजपचा केवळ एक उमेदवार निवडून आला .

उमरेड तालुक्‍यातील पाचगाव गाव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चार वर्षांपूर्वी दत्तक घेतले आहे. हे गाव जिल्ह्यातील पहिले डीजीटल गाव असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून दिले आहे. अनेक विकासाचे उपक्रम राबविल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मात्र चांगलाच झटका बसला आहे. या ठिकाणी काँग्रेसचं समर्थनं असलेल्या सरपंचपदाच्या उमेदवार उषा ठाकरे विजयी झाल्या आहेत.

व्यापाऱ्याकडे खंडणी मागणारा गुन्हे शाखेकडून जेरबंद

उमरेड विधानसभा मतदारसंघही भाजपकडे आहे. भाजपचे आमदार सुधीर पारवे गेल्या दहा वर्षांपासून असतानाही पाचगाव सारख्या गावात भाजपला पराभवाचा धक्का बसल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसमोर कसे जायचे, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडला आहे.

[amazon_link asins=’B0778JFC13,B072XP1QB7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b1e8ffa2-c24c-11e8-b237-4772538fb7f8′]