भाजपचे मंत्री लोणीकर म्हणतात ‘मी सगळ्या तांड्यांना पैसे दिले’, राष्ट्रवादीनं व्हिडिओच दाखवला (व्हिडिओ)

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सर्वत्र सुरु आहेत. युती आणि आघाडी असा थेट सामना सध्या राज्यात पहायला मिळत आहे. सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीनिशी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. भाजपचे मंत्री आणि परतूर मतदारसंघातील उमेदवार बबनराव लोणीकर यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोणीकर स्वतः कार्यकर्त्यांना आपल्या रॅलीमध्ये सामील होण्याचे आवाहन करत आहेत आणि मी सगळ्या तांड्यांना (वस्तीला) पैसे दिले असल्याचे देखील स्पष्टपणे सांगत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा व्हिडीओ ट्विट करत पुन्हा अशा मंत्र्यांना निवडून देणार का ? असा सवाल उपस्थित केला आहे.

काय म्हणालेत नेमकं बबनराव लोणीकर या व्हिडिओमध्ये
बबनराव लोणीकर या व्हिडिओमध्ये आपल्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी ते म्हणतात प्रत्येक तांड्यामध्ये (वस्तीमध्ये) फक्त कमळालाच लीड मिळाले पाहिजे. सगळ्या तांड्यांत मी पैसे दिलेले आहेत आणि म्हणून या निवडणुकीत मला काहीच भीती वाटत नाहीये. आपण सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच म्हणून सगळ्यांनी रॅलीमध्ये यायचं आहे आणि मोदीजींच्या सभेसाठी जायचे आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी