BJP MLA Gopichand Padalkar | ‘अजित पवारांना मुख्यमंत्री केले, तर 4 दिवसांत राज्य विकतील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP MLA Gopichand Padalkar | महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून (बुधवारी) सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत. आज अधिवेशनावेळी सभागृहात गदारोळ माजला होता. यातच आज विधान परिषदेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला लगावला आहे.

 

‘अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर ते चार दिवसांत राज्यच विकून मोकळे होतील,’ अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, ‘अजित पवारांना (Ajit Pawar) जर मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला, तर हे अधिवेशन संपायच्या आत चार दिवसांत ते राज्यच विकून मोकळं होतील. तसेच, पडळकर यांनी राज्यातील परीक्षांच्या घोळावरुन देखील सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात विद्यार्थी केवळ भाजपचेच आहेत का? प्रत्येक ठिकाणी लाखोंचे आकडे येत आहेत.’ असं ते म्हणाले.

पुढे पडळकर म्हणाले, ‘हे प्रकरण आता थेट मंत्रालयापर्यंत पोचतंय.
हे सारं सरकारच्या आशीर्वादानं होतंय. या घोटाळ्यात तुमचेच एवढी लोक यात सामील असतील,
तर पोलीस चौकशी कशी करणार? CBI चौकशी केली, तर बिघडलं कुठं, तुम्ही काही केलं नाही,
तर भीती कसली, करू द्या ना CBI चौकशी, अशी मागणी देखील पडळकर यांनी केली आहे.

 

Web Title :- BJP MLA Gopichand Padalkar | if ajit pawar made chief minister state will be sold 4 days BJP MLA gopichand padalkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात मुंढवा पोलिसांकडून गावठी पिस्टल अन् जिवंत काडतुसे बाळगणार्‍या दोघांना अटक, अग्नीशस्त्रे जप्त

Tiger Shroff | ‘गणपथ’च्या शूटिंगदरम्यान टायगर श्रॉफच्या डोळ्याला दुखापत, अभिनेत्याने शेअर केला फोटो

PDCC Election | अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी आ. रमेश थोरात यांची सलग आठव्यांदा संचालक पदी बिनविरोध निवड

 

Urfi Javed Latest Bold Photo | उर्फी जावेदच्या विचित्र कपड्यांवर नेटकरी झाला फिदा.. चक्क लग्नासाठी घातली मागणी

 

Pune Crime | विकृतीचा कळस ! स्वयंपाक नीट केला नाही म्हणून पतीने घेतला पाठीचा कडकडून चावा; पत्नीची थेट पोलिसांत तक्रार