PDCC Election | अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी आ. रमेश थोरात यांची सलग आठव्यांदा संचालक पदी बिनविरोध निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PDCC Election | जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी भाजपचे अभिमन्यू गिरिमकर (Abhimanyu Girimkar) आणि राष्ट्रवादीचे अशोक खळदकर (Ashok Khaldakar) यांनी आज (बुधवारी) निर्धारित वेळेत आपापले फॉर्म माघारी (PDCC Election) घेतले. यामुळे अजित पवारांचे (Ajit Pawar) निकटवर्तीय असणारे रमेश थोरात (Ramesh Thorat) यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात हे ‘अ’ गटातून बिनविरोध निवडून येत सलग 8 वेळा जिल्हा बँकेवरती संचालक म्हणून निवडून आले आहेत.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे रमेश थोरात (Ramesh Thorat) हे विश्वासू सहकारी म्हणून पाहिले जाते. रमेश थोरात हे 1985 पासून वारंवार या बँकेच्या संचालक पदावर थोरात कार्यरत आहे. मागील सलग 5 वर्ष बँकेचे अध्यक्ष आहेत. या निवडीनंतर राष्ट्रवादी (NCP) समर्थकांनी जल्लोष केला. पुण्यात समर्थकांनी थोरात यांना पेढे भरून आनंद व्यक्त केला गेला. दौंड शहर केडगाव, यवत, वरवंड पाटस या परिसरात राष्ट्रवादी समर्थकांनी मिठाई वाटुन जल्लोष साजरा केला. (PDCC Election)

दरम्यान, ‘गट-तट विसरून गेली 37 वर्षापासून तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सभासदांची कर्ज वाटप करून सेवा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच जिल्हा बँक देशात अव्वल बनली आहे. हा विजय सर्वसामान्य सोसायटी सभासद दौंड तालुक्यातील जनता, शेतकरी व मतदारांना समर्पित करतो.’ असं रमेश थोरात (Ramesh Thorat) यांनी म्हटलं.

 

Web Title :- PDCC Election | ajit pawar close friend ramesh thorat new director district bank unopposed election eighth time row

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Urfi Javed Latest Bold Photo | उर्फी जावेदच्या विचित्र कपड्यांवर नेटकरी झाला फिदा.. चक्क लग्नासाठी घातली मागणी

 

Pune Crime | विकृतीचा कळस ! स्वयंपाक नीट केला नाही म्हणून पतीने घेतला पाठीचा कडकडून चावा; पत्नीची थेट पोलिसांत तक्रार

 

Pune Crime | भाईगिरी करणारा सराईत वर्षभरासाठी स्थानबध्द; पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई

 

Mohammad Huraira | शोएब मलिकच्या सावत्र भावाच्या मुलांनं पाकिस्तान क्रिकेटमध्ये घातली धूमाकूळ, पाहा कोण आहे ‘हा’ खेळाडू?

 

Urvashi Rautela Bold Video | उर्वशी रौतेलानं बोल्ड व्हिडिओ शेअर करून दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी ऋषभ पंतचं नाव घेऊन तिला केलं ‘ट्रोल’

 

MahaTET Exam Scam Case | पुणे पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई, GA Software कंपनीचा सौरभ त्रिपाठी ताब्यात