संजय राऊत हिंदू आहेत की मुघलांची ‘औलाद’ ?, ‘या’ भाजप नेत्याची ‘जहरी’ टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. त्यापूर्वी उदयनराजे यांनी शिवसेनेची स्थापना करताना शिवरायांच्या वंशजांना विचारले होते का ? शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा असा सल्ला दिला, याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असे आव्हान राऊत यांनी दिले. संजय राऊत यांनी उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितल्यानंतर भाजप नेत्यांनी संजय राऊतांना लक्ष्य केले आहे.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी हाच मुद्दा पकडून संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. हिदुत्वाचा अपमान तर केलातच, आता शिवरायांच्या वंशजांचा सुद्धा अपमान करत आहात. मात्र, शिवरायांच्या वंशजांचा अपमान कदापि सहन करणार नसल्याचे लाड म्हणाले. तसेच उदयनराजे भोसले यांना शिवरायांचे वंशज आहे का ? असे विचारणारे संजय राऊत हे हिंदू आहेत की मुघलांची औलाद ? अशा शब्दात आमदार प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे.

दरम्यान, राऊतांच्या विधानाचा समाचार घेताना शिवेंद्रराजे यांनी या वादात उडी घेतली आहे. छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा काय पुरावा द्यावा हे संजय राऊतांनीच सांगावं. तसेच मी किंवा उदयनराजे, संभाजीराजे काही बोललो नव्हतो. संजय राऊत यांनीच वाद सुरु केला आहे. त्यामुळे त्यांनीच आता हा वाद संपवावा असे शिवेद्रराजे म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/