‘बालाकोटमध्ये थोडावेळ थांबलो असतो तर लाहोरमध्ये तिरंगा फडकला असता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले असून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे . राजकीय नेत्यांच्या सभांना वेग आला आहे .  राजकीय नेत्यांमध्ये , लोकसभेच्या उमदवरांच्या भाषणांमध्ये भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा सर्रास विषय निघतोच .

आता उत्तर प्रदेशमधल्या भाजपचे आक्रमक नेते संगीत सोम यांनी ‘जर भारतीय वायूसेनेचे विमान आणखी थोडावेळ तिथे थांबले असते, तर लाहोरमध्येही तिरंगा फडकला असता ,  असे वक्तव्य केले आहे . पश्चिम उत्तर प्रदेशमधील शामली येथे आयोजित एका रॅलीत ते बोलत होते . याबाबतचे वृत्त एएननाय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले , ‘बालाकोट येथे जेथेपर्यंत आमची वायूसेना पाहोचली . ते ठिकाण लाहोरपासून खूप जवळ आहे. मित्रांनो ते ठिकाण इतके जवळ आहे की , दोन मिनिट आणखी थांबले असतो तर तिरंगा लाहोरमध्येही फडकला असता’.

https://twitter.com/ANINewsUP/status/1107523368461496320

दरम्यान आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आमदार सोम हे सतत चर्चेत असतात .  त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर देखील त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे . यापुर्वी २०१३ मध्ये मुझफ्फरनगर दंगलीत त्यांचे नाव आले होते .  प्रक्षोभक भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे .