BJP-MNS Alliance | भाजप-मनसे युती होणार? ‘तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल’ – मनसे नेते बाळा नांदगावकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP-MNS Alliance | राज्यातील काही जिल्ह्यात पुढील वर्षी महानगरपालिका निवडणुका (Municipal elections) होणार आहेत. या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी मनसे आणि भाजप युतीवर एक विधान केलं आहे. आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजपची युती (BJP-MNS Alliance) होणार का? या प्रश्नावर बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

मनसे -भाजपची युतीबाबत (BJP-MNS Alliance) बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, ‘एकला चलो यामधून आम्ही निवडणूका लढवल्या आहेत. मात्र तुर्तास तरी भाजपा सोबत युतीबाबत कोणतीही चर्चा नाही, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, ‘तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल’ असं देखील विधान त्यांनी केलं आहे. या विधानामुळे युतीबाबात राजकीय वर्तुळात तर्कवितर्क चर्चा होताना दिसत आहे.

 

नुकतंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली.
दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. परंतु, ही एक कौटुंबिक भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं.
त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी दिवाळी पाडव्याच्या दिवशी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज ठाकरेंच्या घरी भेट घेतली होती.

दरम्यान, आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
6 डिसेंबरपासून त्यांचा दौरा सुरु होणार आहे.
त्यानंतर 14 डिसेंबरपासून राज ठाकरे मराठवाड्याचा दौरा करतील आणि मग पुन्हा 16 जिसेंबर रोजी पुण्यात राज ठाकरे एक बैठक घेणार आहेत.
राज ठाकरे राज्यातील 6 विविध ठिकाणी बैठका घेणार आहेत. आता दोन ठिकाणीच्या तारखा ठरल्या आहेत.
त्यानंतर राज ठाकरे कोकणात जातील.
पण त्या दौऱ्याची तारीख अद्याप ठरलेली नाही, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. (BJP-MNS Alliance)

 

Web Title :- BJP-MNS Alliance | will there be a bjp mns alliance in maharashtra bala nandgaonkar said you will get good news soon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Hikes Traffic Fines | महाराष्ट्रात मोटार वाहन कायद्यात दंडात मोठी वाढ ! नो-पार्किंग, विना हेल्मेटसाठी 500 रूपये तर ट्रिपल सीटसाठी 1000 रुपये दंड

Nia Sharma | TV पासून दूर आहे निया शर्मा, म्हणाली – ‘मला नाही माहित माझ्याकडे काम का येत नाही’

Satara District Bank | सातारा जिल्हा बँकेत वेगळंच चित्र ! राष्ट्रवादी देणार भाजपला अध्यक्षपद?