मजेदार व्हिडीओतून भाजपने उडवली विरोधकांची खिल्ली

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – भारतीय जनता पार्टीने आज काही अ‍ॅनिमेटेड व्हिडीओ रिलीज केले आहेत. या व्हिडीओतून त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या व्हिडीओतून भाजपने राहुल गांधीं, महागठबंधनमधील पंतप्रधान बनण्याची इच्छा असलेले नेते, उत्तर प्रदेशमध्ये सपा बसपची युती, बालाकोट एअरस्ट्राईकचे पुरावे अशा मुद्यांवर विरोधकांची खिल्ली उडवली आहे.