भाजपा खासदार गौतम गंभीरला ठार मारण्याची धमकी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी क्रिकेटर आणि पूर्व दिल्लीचे भाजपा खासदार गौतम गंभीर यांना जीवे ठार मारण्याची देण्यात आली आहे. खासदार गौतम गंभीर यांनी यासंदर्भात शाहदरा जिल्हा पोलीस आयुक्तांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे.

गंभीर यांनी म्हटले आहे की, एका आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून आलेल्या कॉलवरून मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करून माझ्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार करण्यात यावा.

37f9_whatsapp-image-2019-12-21-at-13_122119021011.jpg

गौतम गंभीरला दोन दिवसांपुर्वीच जीवे ठार मारण्याची धमकी फोनवरून देण्यात आली होती, याबाबतची तक्रार त्याने आज दिली. याबाबत गौतम गंभीरने शाहदरा पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. एका आंतरराष्ट्रीय कॉलवरून कुटुंबाला ठार मारण्याची धमकी आली असल्याने एफआयआर दाखल केली आहे. कुटुंबाला सुरक्षा पुरविण्याची विनंती त्याने पत्रात केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/