खळबळजनक ! भाजप नगरसेविकेची विष प्राशन करून आत्महत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या नगरसेविका शांताताई हिरे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. फुलेनगर परिसरात प्रभाग 4 मधील त्या नगरसेविका होत्या. त्यांच्या अशा जाण्यामुळे एकच खळबळ उडाली असून त्यांनी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

शांताताई हिरे या मागील काही दिवसांपासून आजाराने ग्रासलेल्या होत्या. रोजच्या दुखण्याला आणि आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शांताबाई त्यांच्या कामामुळे संपूर्ण नाशिकमध्ये प्रसिद्ध होत्या. सभागृहात त्या कायम नागरिकांचे प्रश्न मांडत होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, शांताताई हिरे या 2017 ला पहिल्यांदा नगरसेविका झाल्या. संपूर्ण गावात त्या हसून खेळून रहात होत्या. गावातील प्रत्येकाशी त्यांचे चांगले संबंध होते. काम चांगलं असतानाही त्या आजारामुळे वैतागल्या होत्या. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलून आपले आयुष्य संपवले. या प्रकरणाची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/