आरे कॉलनीतील मेट्रो ‘कार’शेडला स्थगिती दिल्यानंतर भाजपची टीका, म्हणाले – ‘विनाश काले विपरीत बुध्दी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी युतीत असल्यापासून विरोध असलेल्या मेट्रो कार शेड संंबंधित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आरे कारशेडच्या कामाला नव्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. परंतू या निर्णयाला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे.

परंतू यानंतर भाजप नेते अशिष शेलार यांनी या निर्णयावर टीका केली आहे. ते म्हणाले की विनाश काले विपरीत बुद्धी, स्वत:च्या अहंकारासाठी मुंबईकरांचे स्वप्न भंग करण्याचे काम करुन नका. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. यावर न्यायालायाने देखील आपली बाजू मांडली आहे. विकासाच्या कामात न्यायालयाने देखील हिरवा कंदील दिला आहे, असं असताना आता यावर पुन्हा राजकारण करावं हे दुर्दैवी आहे.

उद्धव ठाकरेंनी आज मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर मोठा निर्णय घेतला. पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की मुंबईतील आरे कारशेड कामाला स्थगिती देण्यात आली आहे. आम्ही मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली नाही तर कारशेडला स्थगिती दिली आहे. झाडांची कत्तल मला मंजूर नाही. आपल्या हातातील वैभव गमावणे योग्य नाही. जोपर्यंत याचा पूनर्विचार होणार नाही तो पर्यंत आरेमधील एकाही झाडाचे पान तोडता येणार नाही. यानंतर भाजपकडून या स्थगितीला विरोध करण्यात आला.

Visit : Policenama.com