भाजप नेते प्रसाद लाड यांची ‘गळती’; नेटिझन्स म्हणतात ‘या’ कारणासाठी फाडायला हवी होती पावती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या संकटानंतर आता राज्यभरात हळूहळू अनलॉकची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील विविध उद्योगधंदे आणि दुकाने सुरु करण्यात आले आहेत. त्यानंतर आता राज्यातील मंदिरं खुली करण्याची मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे नेते राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं करत आहेत. कोरोनाच्या संकटानंतर आता राज्यभरात हळूहळू अनलॉकची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील विविध उद्योगधंदे आणि दुकाने सुरु करण्यात आले आहेत. त्यानंतर आता राज्यातील मंदिरं खुली करण्याची मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे नेते राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं करत आहेत. मुंबईमध्ये देखील सिद्धीविनायक मंदिरासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड सहभागी झाले होते.

यावेळी काहीही झालं तरी आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करणार” अशी भूमिका घेणाऱ्या भाजपाच्या काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यावेळी आंदोलन करणाऱ्या प्रसाद लाड यांना एका पत्रकाराने तोंडावरील मास्क निघाल्याचे लक्षात आणून दिले. यानंतर लाड यांनी महानगरपालिकेमध्ये जाऊन मास्क नीट न लावल्याबद्दल दंड भरला. याविषयी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी माहिती दिली. मात्र ही माहिती देताना त्यांनी दिलेल्या हिंदी कॅप्शनवरुन ते सध्या जोरदार ट्रोल होत आहेत. या आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलेली हिंदी वाचून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

प्रसाद लाड यांनी आपल्या ट्विटमध्ये “गलती को माफी नहीं , हम कोई भी हो न्याय व्यवस्था सबसे बडी है … आंदोलन मे पोलीस कि दडपशाही कारण मेरा मुह: का मास्क निच्ये आया मुझे ये बात झी न्यूज ने नजर में लाई मैने मेरी गळती कि माफी मांगते हुवे खुद्द महानगर पालिका कार्यालय जाके खुद जुर्माना भर दिया..” असं हिंदीमध्ये ट्विट केलं आहे. त्यांनी हे ट्विट करून २०० रुपये दंड भरलेल्या पावतीचा देखील फोटो ट्विट केला. यामध्ये त्यांनी मास्क निचे ऐवजी “निच्ये” आणि गलती ऐवजी “गळती” अशा शब्द टाईप झाला आहे. यावरुनच आता त्यांना हिंदी भाषेच्या वापरासाठी ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या चुकीबद्दल यांच्यावर जोरदार टीका होत असून नेटिझन्सनी प्रसाड लाड यांची ही ‘गळती’ ओळखली असून याचसाठी पावती फाडायला हवी होती असं म्हटलं आहे.

https://twitter.com/Nashik_Shubham/status/1316224314841075713