भाजपमध्ये मोठया फेरबदलची ‘दाट’ शक्यता ; PM मोदींच्या गैरहजेरीत १३ ,१४ जूनला दिल्‍लीत ‘जम्बो’ बैठक

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देशातील भाजपच्या प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांची १३ व १४ जून रोजी दिल्‍लीत बैठक बोलावली आहे. बैठकीदरम्यान पक्षांतर्गत निवडणुकावर शिक्‍कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. अमित शहांकडे सध्या गृहमंत्री पदासाठी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. मात्र, एक व्यक्‍ती एक पद या तत्वानुसार तसेच शहा यांचा ३ वर्षाचा अध्यक्ष पदाचा कार्यकाल या वर्षाच्या सुरवातीलाच संपला असल्याने त्यांना अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे अध्यक्ष पदाची जबाबदारी कोणावर सोपवायची याचा फैसला देखील या बैठकीत होवु शकतो तसेच इतर महत्वाच्या विषयांवर देखील विचार विनिमय होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार नाहीत कारण ते १३ आणि १४ जूनला किर्गिझस्तानची राजधानी बिष्केक येथे एससीओच्या बैठकीस जाणार आहेत.

भाजपच्या एका बडया नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, बैठकीस देशातील सर्व प्रदेशाध्यक्षांना आणि प्रमुख नेत्यांना बोलाविण्यात आले आहे. सर्वच राज्यातील प्रदेश भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम ठरविण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार आहे. अमित शहा यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा कार्यकाल यंदा वर्षाच्या सुरवातीलाच संपला होता. मात्र, लोकसभा निवडणुक असल्याने त्यांना काही कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली. गृहमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर अमित शहा हे अध्यक्ष पदाचा राजीनामा देतील असे पक्षातील काही जणांचे म्हणणे आहे. मात्र, अद्यापही याबद्दल भाजपकडून अधिकृतरित्या भूमिका जाहिर करण्यात आलेली नाही.

१३ आणि १४ जून रोजी दिल्‍लीत होणार्‍या बैठकीत बूथ स्तरापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत संपूर्ण संघटनेची पुर्नबांधणी केली जाण्याची शक्यता आहे. अध्यक्ष निवडीनंतर राष्ट्रीय कार्यकारिणीमधील सदस्यांची निवड अध्यक्षांकडून होईल. दरम्यान, या महत्वपुर्ण बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे या बैठकीत पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड होण्याची कमी शक्यता आहे.

महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष बदलणार –
आगामी काही महिन्याच्या आतच हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या तिन्ही राज्यातील संघटनात्मक निवडणुका टाळल्या जाण्याची शक्यता विर्तविण्यात येत आहे. मात्र, महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागल्याने महाराष्ट्रात निश्‍चितपणे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा राज्यातील दुसर्‍या बडया नेत्याकडे सोपवली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस ठरविणार प्रदेशाध्यक्ष –
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेनेला मोठे यश मिळाले. युतीच्या जास्तीत जास्त जागा निवडुन आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक आग्रही होते. त्यासाठी त्यांनी दिवस-रात्र एक केली होती. म्हणूनच की काय राज्यात युतीला ४१ जागा मिळाल्या. त्याचे सर्वश्री श्रेय मोदी-शहा यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते. त्यामुळे आगामी प्रदेशाध्यक्ष ठरविताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या भाजप नेत्याचे नाव सुचवतील त्यांच्याच गळयात भाजप प्रदेशाध्यक्षाची माळ पडणार हे निश्‍चीत झाले आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

बहुगुणी पालकाची भाजी खा ; आरोग्य राखा

हवेच्या प्रदुषणामुळे ही होतो अनियमित मासिक पाळीचा त्रास

पहाटे सेक्स केल्याने हार्ट अटॅकचा धोका होतो कमी

सिगारेटच्या धुरामुळे फुफ्फुसासह डोळयांनाही धोका !