‘सध्याच्या परिस्थितीला भाजपच जबाबदार’ : बाळासाहेब थोरात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘सध्याच्या परिस्थितीला भाजपच जबाबदार आहे’, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिल्व्हर ओक येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आदी नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “राज्यपाल काय पाऊल उचलतात याकडे आमचं लक्ष आहे. अद्याप आम्ही कोणताही रणनीती ठरवलेली नाही.” यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, आघाडीची इच्छा आहे की, राज्यात भाजपचे सरकार येऊ नये यासाठी तुम्ही काही पाऊल उचललंय का? या प्रश्नाला उत्तर देताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “योग्य वेळ आल्यानंतर राज्यपालांना निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीकडे आमचं लक्ष आहे. अद्याप आमची कोणतीही रणनीती ठरलेली नाही. राज्यात भाजप सरकार येऊ नये यासाठी काय करावं लागेल याचा विचार आम्ही करतो आहोत. सध्याच्या सर्व परिस्थितीला भाजप सरकार जबाबदार आहे.”

Visit : Policenama.com 

 

You might also like