महाराष्ट्रात पुन्हा युतीचेच सरकार, धुळ्यात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला ‘विश्वास’

धुळे : पोलिसनामा ऑनलाईन – भाजपच्या महाजानदेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला गुरुवार पासून सुरवात झाली, यावेळी धुळ्यामधे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पुन्हा एकदा युती सरकार येईन असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

भाजपच्या यात्रेला लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून इतर पक्ष ही यात्रा काढायला लागले आहेत, माझ्या त्यांना शुभेच्छा असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावेळी नुकतीच यात्रा सुरु केलेल्या सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. तसेच काँग्रेसची भ्रष्टाचाराची जत्रा निघालेली असल्यामुळे त्यांची यात्रा आहे की नाही ते मला माहित नाही असही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महाजनादेश यात्रा आतापर्यंत ४० पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघातून आली आहे. आम्ही आजवर केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. धुळ्यानंतर ही यात्रा जळगावच्या दिशेने जाणार आहे. या यात्रेचा तिसरा टप्पा १३ ते १९ सप्टेंबर पर्यंत असणार आहे. या टप्प्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा समावेश असणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

आतापर्यंत जलयुक्त शिवार योजनेमार्फत २४० कोटींची कामे झाली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मोटार उद्योगात आलेल्या मंदीच्या प्रश्नावर केंद्र सरकार लक्ष देऊन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच येत्या काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त –