अबब ! असिस्टंट कमिश्नरकडे सापडलं 150 कोटींचं ‘घबाड’

इंदौर : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या अबकारी विभागात सहाय्यक आयुक्त पदावार असलेल्या अलोक खरे याच्याकडे कोट्यावधींची नाहीतर अब्जावधींची संपत्ती सापडली आहे. हा सगळा काळा पैसा आहे. अलोख खरेशी संबंधित पाच ठिकाणी लोकायुक्त पोलिसांनी धाडी टाकल्या तेव्हा त्याची संपत्ती बघून पोलिसांची  टीम देखील हैराण झाली.

अलोक खरे याच्याकडे 150 कोटी पेक्षा जास्त बेहिशोबी संपत्ती सापडली. अलोक खरे याची मध्य प्रदेशमध्ये अनेक शहरांत 21 ठिकाणी मालमत्ता होती. यामध्ये अलिशान बंगले, जमिनी, गाड्या, सोने-चांदीचे दागिने या सगळ्यांचा समावेश आहे. अलोक याच्या ऑफिसमध्ये त्याला बसण्यासाठीची असलेल्या खुर्चीची किंमत 85 हजार रुपयाची असल्याचे समोर आले आहे. लोकायुक्त पोलिसांचं पथक जेव्हा अलोक खरेच्या इंदूरच्या घरी पोहोचलं तेव्हा तो ड्युटीवर नव्हता. आता त्याच्यावर कारवाई झाली आहे. अलोकने इंदूरच्या सगळ्यात महागड्या भागातील ग्रँड एक्झॉटिका हाईट्समध्ये फ्लॅट घेतला आहे.

अलोक खरेने रतलाम, धार आणि इंदौर या जिल्ह्यांमध्ये काम केलं होतं. तिथेच त्याने अब्जावधींचा काळा पैसा जमवला. त्याच्याविरुद्ध अनेकदा तक्रारी होऊनही करावाई होत नव्हती. विशेष म्हणजे अलोक खरे हा एका अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराचा तपास करत होता. अलोक खरे या भ्रष्ट अधिकाऱ्याचा पगार होता 1 लाख रुपये आणि 23 वर्षांत त्याचे त्याने अब्जावधीची माया जमवली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी