काय सांगता ! होय, हॉस्पिटलच्या फ्री WiFi वरून डाऊनलोड केले 80 हजार पॉर्न फोटो

लंडन : पोलीसनामा ऑनलाइन –   विकृत मानसिकता काय असते? याचा प्रकार लॉकडाऊन काळात एका रुग्णालयात पाहायला मिळाला. रुग्णालयात दाखल केलेल्या एका तृतीयपंथी महिलेने सार्वजनिक फ्री WiFi वरून लहान मुलांचे अश्लील फोटो डाऊनलोड केल्याचे समोर आले.एवढ्यावरच न थांबता तिने तब्बल 80 हजार पॉर्न फोटो डाऊनलोड केले. याची माहिती मिळताच लंडनच्या पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला आणि यात दोन लॅपटॉप, एक फोन आणि बऱ्याच सिडी जप्त केल्या. पोलिसांनी तिचा लॅपटॉप तपासला असता त्यात हजारो चाइल्ड पॉर्न फोटो आढळले. यानंतर 54 वर्षीय तृतीयपंथीय वृद्ध महिलेला अटक केली आहे. तिचे नाव ज्युली मार्शल असे आहे.

पोलिसांनी त्या लॅपटॉप अन् मोबाइलमध्ये फोटो सापडल्याचे सांगितले, त्यानंतर लंडनच्या प्रेस्टन क्राउन न्यायालयाने तिला शिक्षा सुनावली. असून आता या महिलेला पुरुषांच्या तुरुंगात ठेवायचे की महिलांच्या तुरूंगात टाकायचे? याबाबत पोलीसही गोंधळले आहेत.

पोलिसांना या तृतीयपंथी महिलेच्या लॅपटॉपवरून 80 हजार मुलांचे अश्लील फोटो मिळाले. 15 वर्षांच्या कालावधीत तिने ही छायाचित्रे जमा केली आहेत. यासाठी तिला नऊ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 54 वर्षीय तृतीयपंथी ज्युली मार्शलने हे फोटो डाऊनलोड केल्याचे उघडकीस आले आहे.

हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर तिला ऑगस्ट 2017 पासून रुग्णालयात दाखल केले होते.ज्युलीला ज्या रुग्णालयात दाखल केले होते, तिथे तिचा इंटरनेट पॅक संपला होता. तिने सार्वजनिक वायफायच्या मदतीने हा पराक्रम केला. त्यानंतर रुग्णालयाचेही वायफाय वापरल्याचे समजले. 2004 ते 2018 या कालावधीत तिने हे सर्व अश्लील फोटो डाऊनलोड केल्याचे समोर आले.

जेव्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली, तेव्हा या अश्लील चित्रांना तीन प्रकारांमध्ये विभागले होते. त्यानुसार न्यायालयाने ज्युलीला 9 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने तिला पुन्हा अशी चूक करू नको, असे बजावले आहे. यूकेमध्ये 2016 पर्यंत तृतीयपंथी गुन्हेगारांना महिलांच्या कक्षात ठेवण्यात येत होते. परंतु काही प्रकरणांत त्यांनी महिला कैद्यांवर हल्ला केला, त्यानंतर त्यांना पुरुषांच्या तुरुंगात ठेवले. परंतु इतर गुन्हेगार पुरुषांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे आता या तृतीयपंथी ज्युलीला ठेवायचे कुठे? हा पोलिसांना प्रश्न पडला आहे.