अखिल भारतीय सेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

वाघोली  : प्रतिनिधी  (कल्याण साबळे पाटील ) –   देशात कोरोना या संसर्गजन्य रोगामूळे पूर्ण देश लॉकडाउन आहे. त्यामुळे रुग्णालयात रक्त कमी पडू नये म्हणून आखिल भारतीय सेनेच्या वतीने लॉकडाउनचे सर्व नियम पाळत रक्तदान शिबिर घेण्यात आले.या शिबिरात सुमारे एकशे सत्तावीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आव्हान केले होते. पुणे जिल्हा आखिल भारतीय सेनेच्या वतीने वाघोली येथे सोशल डिस्टशिंगचे पालन करत रक्तदान शिबिर घेण्यात आले.या शिबीरात एकशे सत्तावीस तरुणांनी रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून रक्तदान केले,येत्या काळात रक्ताची अजून गरज भासल्यास पुणे जिल्हा आखिल भारतीय सेनेच्या वतीने पुन्हा एकदा मोठे रक्तदान शिबीर घेतले जाइल असे

शनीभाऊ शिंगारे यांनी लोकमत चे प्रतिनिधी यांच्याशी बोलतांना सांगितले.यावेळी दीपक भंडलकर,अक्षय बेंडावले,अशिष धोत्रे,महेश जावळे,अकाश मोहीते,रोहन ,नीतीन साळवे,रूषी सातव,प्रतीक,तुषार वीर,तसेच डाॕ.अरुण वाळूंज यांची संपुर्ण टिम आणि शनीभाऊ शिंगारे उपस्थित होते.