Blood Sugar | डाळिंब खाल्ल्याने वाढू शकते का ब्लड शुगर? जाणून घ्या काय आहे सत्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar | मधुमेह (Diabetes) हा असा आजार आहे जो आयुष्यभर तुमच्यासोबत राहतो. मात्र, आरोग्य तज्ञांच्या मते, रुग्ण आपली दिनचर्या आणि आहारामध्ये (Routine And Diet) आवश्यक बदल करून ब्लड शुगरवर (Blood Sugar) नियंत्रण ठेवू शकतो.

 

मधुमेहाच्या रुग्णांना (Diabetes Patients) फळांच्या सेवनाबाबत खूप सावध राहावे लागते, कोणते फळ ब्लड शुगर (Blood Sugar) वाढवू शकते आणि कोणते फळ त्यांच्यासाठी फायदेशीर आहे हे अनेकांना माहिती नसते. अशा स्थितीत डाळिंबाच्या (Pomegranate) सेवनाबाबत रुग्णांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. डाळिंबाचे सेवन मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे की नाही ते जाणून घेवूयात (Let’s Know If Pomegranate Consumption Is Beneficial For People With Diabetes) –

 

मधुमेही रुग्णांसाठी का विशेष आहे डाळिंब (Why Is Pomegranate Special For Diabetic Patients) ?
एका संशोधनानुसार डाळिंबात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट (Antioxidant) आढळतात. संशोधनात असे आढळून आले आहे की डाळिंबात ग्रीन टी आणि रेड वाईनपेक्षा (Green Tea And Red Wine) जवळपास तिप्पट अँटीऑक्सिडंट असतात. तज्ज्ञांच्या मते, हे ऑक्सिडंट मधुमेह किंवा फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान यासारख्या आजारांशी लढतात.

 

दुसरीकडे, आरोग्य तज्ञांचा दावा आहे की डाळिंबाच्या बिया इंसुलिन संवेदनशीलता सुधारतात, जे मधुमेहासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे रुग्णांनी ज्यूसऐवजी डाळिंबाचे दाणे खावेत.

डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने शुगर वाढते का (Does Drinking Pomegranate Juice Increase Sugar) ?
डाळिंबाचा ज्यूस उच्च ब्लड शुगर लेव्हल (High Blood Sugar Level) स्थिर ठेवण्यास मदत करतो. याच्या मदतीने तुम्ही ब्लड शुगर पातळी कमी करू शकता. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी डाळिंबाचा ज्यूस प्यावा, मात्र त्याचे प्रमाण तुमच्या डॉक्टरांकडून जाणून घ्या.

 

मधुमेहाच्या रुग्णाने कोणत्या फळांचा ज्यूस प्यावा (Which Fruit Juice Should A Diabetic Patient Drink) ?
यामध्ये संशोधकांना आढळून आले आहे की, डाळिंबाचा ज्यूस शरीरातील ग्लुकोजचा (Glucose) प्रतिसाद कमी करतो.
डाळिंबाचा ज्यूस मधुमेहाने त्रस्त लोकांच्या शरीरातील ब्लड शुगर पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त असल्याचे दिसून आले.
हे परिणाम सामान्य वजन असलेल्या लोकांमध्ये दिसून आले आणि त्यांना पिण्यासाठी 230 मिली ज्यूस देण्यात आला.

 

मधुमेही रुग्ण कोणती फळे खाऊ शकतात (What Fruits Can Diabetic Patients Eat) ?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेही रुग्ण सफरचंद, संत्री, पपई, किवी, पीच आणि बेरी (Apple, Orange, Papaya, Kiwi, Peach And Berry)
मर्यादित प्रमाणात सेवन करू शकतात. कारण या फळांमध्ये व्हिटॅमिन-सी, फायबर (Fiber) आणि इतर अनेक आवश्यक पोषक घटक असतात.
या फळांचे सेवन निर्धारित प्रमाणात केल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar | can eating pomegranate increase blood sugar know what is the truth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

White Hair Problem | पांढर्‍या केसांची समस्या मुळापासून होईल दूर, फक्त करा ‘हे’ 3 अचूक उपाय; जाणून घ्या

 

Datura Leaves Benefits | ‘या’ पानांचा वापर केल्याने गळणार नाहीत डोक्याचे केस, कुठेही दिसली तर तोडून आणा घरी; जाणून घ्या

 

Mental Health | मानसिक स्वास्थ्य जपा ! ‘या’ 3 गोष्टींपासून अंतर ठेवा; जाणून घ्या