Blood Sugar कंट्रोल करायची असेल तर अवलंबा ‘पथ्य आहार’, जाणून घ्या काय सांगतो आयुर्वेद

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar | मधुमेह (Diabetes) ही एक मेटाबॉलिक स्थिती आहे ज्यामध्ये शरीरात ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) लक्षणीय वाढते. जेव्हा आपण काही खातो तेव्हा त्यात इतर गोष्टींबरोबरच कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) असतात, जे पोटात पचतात आणि ग्लुकोजमध्ये (Glucose) बदलतात आणि नंतर रक्तात पोहोचतात. पण जेव्हा आपल्या खाण्याच्या सवयी बिघडू लागतात, तेव्हा ग्लुकोज शोषून घेणारे इन्सुलिनचे (Insulin) उत्पादन कमी होऊ लागते. त्याचा परिणाम मधुमेहाच्या रूपात समोर (Blood Sugar) येतो.

 

आपण असे म्हणू शकतो की आपला आहार आणि जीवनशैली मधुमेहाला कारणीभूत आहे. म्हणूनच खाण्यापिण्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे, पण अनेकदा मधुमेह झाल्यास (Blood Sugar) आपण काय खावे या संभ्रमात असतो. या समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. नितीका कोहली (Dr. Nitika Kohli) यांनी केला आहे.

 

पथ्य आहार समजून घेणे आवश्यक (It Is Important To Understand The Diet) :
डॉक्टर नितिका कोहली म्हणतात, आजारपणात काय खावे हे समजून घेणे आवश्यक आहे. गोष्टी सुलभ करण्यासाठी पहिले ध्येय असले पाहिजे की शरीरातील ब्लड शुगर लेव्हल वाढू नये, म्हणून आपण असे अन्न खावे की ज्यामुळे मधुमेहाशी संबंधित इतर गुंतागुंत होऊ नये.

 

डॉ. कोहली यांच्या मते यासाठी आहार (Diet) हा सर्वात सोपा मार्ग आहे. जर आपण पथ्य आहार घेतला, तर तो टाईप 1 (Type 1 Diabetes) आणि टाईप 2 मधुमेहाच्या (Type 2 Diabetes) जोखमीपासून आपले संरक्षण करतो. डॉक्टर निकिता कोहली यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये साध्या पथ्य आहाराबद्दल सांगितले आहे.

मधुमेहासाठी पथ्य आहार (Diet For Diabetics) :
आयुर्वेदात पथ्य आहाराला विशेष महत्त्व आहे. हे प्रत्येक रोगासाठी भिन्न आहाराचे वर्णन करते.
डॉ नितिका यांच्या म्हणण्यानुसार डायबिटीजमध्ये अतिशय साधा पथ्य आहार घ्यावा.
मूग डाळ (Moong Dal) आणि कारल्याची भाजी (Bitter Gourd Vegetable) हा डायबेटीसच्या आजारात चांगला पचणारा आणि फायदेशीर आहार आहे.

 

याशिवाय सत्तू (Sattu), जुना तांदूळ (Old Rice), लाल तांदूळ (Red rice), बाजरी (Millet) खूप उपयुक्त आहेत.
या पथ्य आहाराच्या मदतीने मधुमेहाचा आजार आटोक्यात ठेवता येतो, असे डॉ. नितिका सांगतात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Sugar | what is the basic diet for diabetes patient know the exact pathya ahar according to ayurved

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | नारायणगाव येथील खुनाच्या गुन्ह्यातील 2 आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक; गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त

 

Sunny Leone Injured Photo | सनी लिओनीचा ऑपरेशन टेबलवरील जखमी अवस्थेतील फोटो व्हायरल, चाहत्यांना चिंता

 

Multibagger Penny Stocks | 2 महिन्यांपूर्वी गुंतवले असते 1 लाख तर ‘या’ स्टॉकने बनवले असते 8.63 लाख रुपये