Multibagger Penny Stocks | 2 महिन्यांपूर्वी गुंतवले असते 1 लाख तर ‘या’ स्टॉकने बनवले असते 8.63 लाख रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Penny Stocks | कवडी मोलाचे काही पेनी स्टॉक कधी – कधी असा रिटर्न देतात की विश्वासच बसत नाही. काही वेळा या शेअरच्या रिटर्नवर खुद्द शेअर बाजार आणि सेबीही आश्चर्यचकित होते (Multibagger Penny Stocks). असाच एक स्टॉक म्हणजे Tine Agro, ज्याने गेल्या 2 महिन्यांत इतका जबरदस्त रिटर्न दिला आहे की बीएसई स्वत:च आश्चर्यचकित झाले होते आणि ASM लावावा लागला होता. (Best Multibagger Stocks List)

 

31 डिसेंबर 2021 रोजी Tine Agro चा स्टॉक BSE वर फक्त 6.80 रूपयांच्या पातळीवर बंद झाला.
काल म्हणजेच 10 मार्च रोजी हा शेअर 58.70 रुपयांवर पोहोचला. अडीच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत हा 763 टक्के रिटर्न आहे.

 

हा शानदार रिटर्न अशा वेळी आला आहे जेव्हा ब्रॉडर मार्केट विक्रीच्या गर्तेत आहे.
जेव्हा हा स्टॉक चढता होता, त्याच काळात बीएसई सेन्सेक्स 4.79 टक्क्यांनी घसरला होता. (Multibagger Penny Stocks)

 

या पेनी स्टॉकने दिलेल्या रिटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 31 डिसेंबर रोजी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 8.63 लाख रुपये झाले असते.
मात्र, गेल्या 2 दिवसांपासून हा स्टॉक सतत लोअर सर्किटला धडकत आहे.

काल देखील तो त्याच पातळीवर खुला झाला आणि बंद होताच 4.94 टक्क्यांनी घसरला होता.
आजही तो खुला होताच पुन्हा 4.94 टक्क्यांनी घसरून 55.80 रुपयांवर आला. अशाप्रकारे गेल्या दोन सत्रांमध्ये हा शेअर 9.64 टक्क्यांनी घसरला आहे.

 

मात्र, अशा शेअरमध्ये गुंतवणूक करताना जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.
जे स्टॉक अशाप्रकारे झपाट्याने वाढतात ते अस्थिर होण्याची शक्यत असते आणि कष्टाने कमावलेला पैसा बुडण्याचा धोका असतो.

 

अहमदाबाद येथील या कंपनीच्या शेअर्समधील अस्थिरतेमुळे बीएसईने सध्या त्यावर एएसएम ठेवले आहे.
मार्च 2019 ते डिसेंबर 2020 पर्यंत कंपनीची विक्री शून्य होती. यानंतर, कंपनी काही तिमाहीपासून विक्रीचे आकडे रिपोर्ट करत नाही.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Penny Stocks | best multibagger penny stocks multiplyer return tine agro bse value

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा