BMC Mayor Kishori Pednekar | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र; कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BMC Mayor Kishori Pednekar | मुंबईच्या विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली. तसेच संबंधित पत्रात अश्लील भाषेचा वापर करत महापौर पेडणेकर यांना शिवीगाळ देखील झाली आहे. धमकीचं पत्र (Threatening letter) आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. हे पत्र मुंबईबाहेरुन आलं असल्याची चर्चा सुरु आहे.

 

मागील वर्षी महापौर पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांना फोनद्वारे धमकी आली होती. त्यावेळी देखील धमकावणाऱ्याने किशोरी पेडणेकर यांंना जीवे मारण्याची धमकी दिली होती. महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना दुसऱ्यांदा धमकी आली आहे. आता आलेल्या धमकी पत्रात म्हटलं आहे की, माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे सांगुन अश्लिल भाषेत धमकी देणारे हे पत्र महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आलं आहे. या पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, हे धमकीचं पत्र आल्यानंतर आता महापौर किशोरी पेडणेकर या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. (Mumbai Mayor Kishori Pednekar receives death threat)

दरम्यान, वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला होता.
रुग्णालयात उपचारासाठी दिरंगाई झाल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
याच प्रकरणावरुन काही दिवसांपूर्वी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार टीका केली होती.
तसेच त्यांनी असा एक शब्द उच्चारला होता ज्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती. आणि थेट पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल झाल्यावर शेलार हे पोलीस ठाण्यात पोहोचले होते. ‘मी माझी भूमिका त्या दिवशीही स्पष्ट केली.
त्यानंतर सोशल मीडियातही याबाबतची भूमिका स्पष्ट केली. मी कुठल्याही व्यक्तीला, महिलेला, महापौरांना उद्देशून किंवा नाव घेऊन ते वाक्य उच्चारलं नाही.’ अस ते म्हणाले होते.

 

Web Title :- BMC Mayor Kishori Pednekar | BMC mayor kishori pednekar receives death threat in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

LPG Subsidy | स्वयंपाकांच्या गॅस सिलेंडरवर मिळतेय सबसिडी, तुमच्या खात्यात पैसे आले किंवा नाही ‘या’ पध्दतीनं तपासा

Pune Crime | बनावट कागदपत्र्याद्वारे गाडी घेतल्याचे दाखवून पतसंस्थेची 12.75 लाखांची फसवणूक; दत्तवाडी पोलिस ठाण्यात FIR

Pune Crime | दारु पिण्यास पैसे न दिल्याने मित्रांनीच मारहाण करुन लुटले; कात्रज परिसरातील घटना