काय सांगता ! होय, चक्क कौशल्य विकास प्रशिक्षण निधी लाटण्यासाठी ‘बोगस’ केंद्र, बीडच्या 10 संस्थाविरूध्द FIR

मुंबई/बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शासनाच्या कौशल्य विकास प्रशिक्षण निधी लाटण्यासाठी कंत्राटी अधिकाराच्या मदतीने बीडमध्ये बोगस प्रशिक्षण संस्था सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बोगस संस्था स्थापन करून निधी लाटणाऱ्या 10 संस्थाविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबईचे संतोष राऊत यांनी तक्रार दिली आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ही जिल्हा कौशल्य विकास व उद्योजक विकास केंद्रामार्फत शासनाच्या सर्व कौशल्य विकास योजना पार पाडत असते. या योजनेनुसार जिल्ह्यातील कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास केंद्रे शासनाच्या महास्वयम या पोर्टलला जोडण्यात येतात. या पोर्टलद्वारे सदर योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व खासगी आणि शासकीय संस्था नोंदणी करत असतात. नोंदणी झालेल्या अधिकृत संस्थांना शासनाकडून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी 15 हजार रुपयांचा निधी दिला जातो. शासनाचा हा निधी लाटण्यासाठी बीडमधील 10 संस्थांनी पोर्टलच्या कंत्राटी अधिकाऱ्याला हताशी धरून बनावट केंद्र उघडली होती.

शसकीय संकेतस्थाळावरून मान्यता देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर संकेतस्थाळाची जबाबदारी सोपविलेल्या सिल्वर टचकडे चौकशी केली. त्यातून 4 नोव्हेंबर 2018 हा व्यवहार झाल्याचे समोर आले. सुट्टीच्या दिवशीच कंत्राटी कौशल्य विकास अधिकारी तौसीफ शेख याचे लॉग ईन क्रेडेनशियल्सचा वापर करून या संस्थांना मान्यता देण्यात आले असल्याचे सिल्वर टच कडून सांगण्यात आले आहे. याचा अहवाल कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे अप्पर मुख्य सचिवांकडे अहवाल पाठवण्यात आला होता. चौकशअंती अप्पर सचिवांच्या आदेशाने राऊत यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या संस्थांनी आत्तापर्यंत किती निधी लाटला हे समजू शकले नाही.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/