आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ मध्ये एकत्र दिसणार तीनही ‘खान’ ! ‘किंग’ शाहरुख आणि ‘भाईजान’ सलमान करणार धमाका

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार आमिर खान (Aamir Khan) अनेक सिनेमांमुळं चर्चेत आहे. सध्या त्याचा आगामी सिनेमा लाल सिंह चड्ढा (Lal Singh Chaddha) चर्चेत आहे. आता सिनेमाबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, या सिनेमात बॉलिवूडमधील तीनही खान दिसणार आहेत. म्हणजेच आमिर खानच्या या सिनेमात सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) कॅमिओ करताना दिसणार आहे.

या सिनेमात अ‍ॅक्ट्रेस करीना कपूर (Kareena Kapoor) आणि तमिळ अ‍ॅक्टर विजय सेतुपती (Vijay Sethupathi) हे देखील काम करताना दिसणार आहेत. अशात शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या कॅमिओबद्दल माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी रिपोर्टनुसार, शाहरुखनं या सिनेमातील त्याचा कॅमिओवाला पार्ट शुटही केला आहे. दिल्लीत याची शुटींग झाली आहे. युएईला जाण्याआधीच त्यानं याचं शुटींग केलं होतं.

या रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, शाहरुखचा लुक हा 90 च्या दशकातील राज वाल्या अंदाजात दिसणार आहे. त्याची भूमिका 90 च्या दशकापासून प्रेरीत आहे. तर सलमान खानच्या भूमिके बद्दल सांगितलं आहे की, त्याचीही भूमिका 90 च्या दशकातील प्रेमपासून प्रेरीत असणार आहे. अद्याप तरी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

You might also like