बर्थडे पाटीमध्ये ‘डॉल’ सारखी दिसली श्रध्दा कपूर, एक्वा मरीन रंगात दिसला स्टनिंग अवतार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तिच्यासोबत नोरा फतेही या चित्रपटात दिसत आहेत. या चित्रपटात श्रद्धा पूर्णपणे वेगळ्या आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे. या चित्रपटातील श्रद्धाचा लूक आणि तिची स्टाईलदेखील चाहत्यांना चांगलीच पसंत पडत आहे. याआधीही श्रद्धाने आपल्या स्टाईलने अनेकांना वेड लावले आहे. अलीकडेच, इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्ये ती एल्सा नावाच्या कार्टून बाहुल्यासारखी दिसत होती. याशिवाय श्रद्धाने बऱ्याचवेळा वेगळा लुक कॅरी केला आहे.

बहिण वेदिकाच्या वाढदिवसाच्या पार्टीत श्रद्धा एल्सासारखी दिसत होती. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, श्रद्धा एक्वा मरीन कलरच्या गाऊनमध्ये डिस्नेलँडच्या बाहुलीसारखी दिसत आहेत. तिने गालावर आणि डोळ्यांवर हलका गुलाबी मेकअप देखील केला आहे. तिने डोळ्यावर विन्गड आयलायनर लावले आहे आणि ओठांवर अतिशय हलकी गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली आहे. तिचा संपूर्ण गेटअप आणि लूक बाहुलीसारखा दिसत आहे.

श्रद्धाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक अतिशय फंकी स्टाईलमध्ये फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो चाहत्यांना खूपच पसंतीस पडत आहे. या फोटोमध्ये श्रद्धाने पांढऱ्या रंगाचा ब्लॅक ड्रेस परिधान केला आहे. या फोटोमध्ये श्रद्धाचे केस काळ्या आणि जांभळ्या शेडमध्ये दिसत आहेत. श्रद्धाने गळ्यामध्ये नाजुक ब्लॅक हार आणि गोल्डन कलरची साखळी घातली आहे. तिचा लुक कॉलेजच्या मुलींसारखा दिसत आहे. श्रद्धाने कानात मोठ्या हुप्स इअररिंग्ज सुद्धा घातल्या आहेत. तिच्या या फोटोला चाहत्यांना कमेंटचा वर्षाव केला आहे.