COVID-19 : गळ्यात लाल गमछा टाकून ‘कोरोना’ व्हायरसमध्ये कामावर निघाला ‘खिलाडी’ अक्षय ! जाणून घ्या कारण (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तो गळ्यात गमछा टाकून कामावर जाताना दिसत आहे. यावेळी तो पूर्ण काळजी घेत आहे. इतकंच नाही तर इतरांना काय खबरदारी घ्यावी हेही तो सांगत आहे.

खरं तर अक्षय कुमार याचा हा जो व्हिडीओ समोर आला आहे तो आरोग्य मंत्रालयासाठी शुट करण्यात आला आहे. ही एक जाहिरात आहे ज्यातून त्यानं जागरूकता निर्माण केली आहे. यात अक्षय एका गावकऱ्याच्या लुकमध्ये दिसत आहे. यात सरपंचांसोबत अक्षयचा संवाद दाखवला आहे की, कामावर जाताना आता कोरोनासोबत कसं लढावं. जसं की, नेहमी मास्क वापरणं आणि साबणानं हात स्वच्छ करणं. दुसऱ्यांपासून अंतर ठेवणं. ट्विटरवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अक्षयनं हेही सांगितलं की, काम सुरू झालं तरी कोरोसोबतची लढाई सुरू आहे आणि तुम्ही सर्वांनी काळजी घ्या.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. याशिवाय तो आगामी लक्ष्मी बॉम्ब आणि अतरंगी रे या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like