सुप्रसिद्ध ‘सिंगर’, ‘अ‍ॅक्टर’ AL राघवन यांचं 87 व्या वर्षी चेन्नईत निधन, खासगी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : साल 2020 मध्ये एका मागे एक अनेक वाईट बातम्या समोर येताना दिसत आहेत. आता तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील वेटरन सिंगर अ‍ॅक्टर एएल राघवन यांचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी सकाळी म्हणजेच आज (दि 19 जून 2020) कार्डिएक अरेस्टनं त्यांचं निधन झालं आहे. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर आता पूर्ण इंडस्ट्रीत दु:खाची लाट पसरली आहे.

एएल राघवन यांच्या पश्चात पत्नी एमएन राजम, मुलगा ब्रह्मलक्ष्मण आणि मुलगी नलीना मीनाक्षी असं कुटुंब आहे. एमएन राजम यादेखील प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेस आहेत. एका रिपोर्टनुसार, राघवन यांनी चेन्नईच्या एका खासगी रुग्णालयात सकाळी 7.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. फिल्मी करिअर सुरू करण्याआधी राघवन हे एक स्टेज कलाकार आणि सिंगर होते.

राघवन यांनी कृष्णा विजयम सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यात त्यांनी भगवान कृष्णाचा रोल साकारला होता. त्यांनी 100 हून अधिक गाणी गायली आहेत जी लोकांनाही खूप आवडली आहेत. सोलो हिट गाण्यांसोबतच राघवन यांनी अनेक ड्युएट गाणीही गायली आहेत. त्यांचं अखेरचं गाणं 2014 साली रिलीज झालेल्या आदामा जेईकोमोडा (Aadama Jeyichomada) या सिनेमातील Nalla Ketukka Paadam हे आहे. राघवन यांनी काही मालिकेतही काम केलं आहे. राजम यांचं करिअर जेव्हा टॉपला होतं तेव्हाच त्यांनी एमएन राजमसोबत लग्न केलं होतं. तेव्हा तर त्या एकाच दिवसात तीन प्रोजेक्टवर काम करत होत्या. ही 1960 ची गोष्ट आहे. कौटुंबिक जबाबदारीमुळं त्यांना आपलं करिअर सोडावं लागलं होतं.